आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे IPL च्या हैदराबाद टीमचा कर्णधार, अनेक वर्षे लपवून ठेवली होती लव्ह स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केन विलियम्सन जेव्हा पहिल्यांदा गर्लफ्रेंडसमवेत स्पॉट झाला होता. - Divya Marathi
केन विलियम्सन जेव्हा पहिल्यांदा गर्लफ्रेंडसमवेत स्पॉट झाला होता.

स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल-11 मध्ये सनरायजर्स हैदराबादचा कर्णधारपद केन विलियम्सनकडे आहे. विलियम्सनच्या नेतृत्त्वाखाली सनरायजर्सने राजस्थान रॉयल्सवर 9 विकेटने सहज मात केली. शांत स्वभावाचा केन विलियम्सन मैदानात जेवढा खुलून, आक्रमक खेळतो. तेवढा तो खासगी आयुष्यात तो खुला नाही. कारण त्याने आपली लव्ह स्टोरी कित्येक वर्षे त्याने लपवून ठेवली होती. नर्सच्या प्रेमात पडला केन...

 

- केन विल्यमसन मैदानात जितका खुलून खेळतो तितका मात्र खासगी आयुष्यात नाही. तो आपली पर्सनल लाईफ खूपच खासगी ठेवतो. 
- त्याच्याप्रमाणे त्याची लव्ह स्टोरी सुद्धा खूपच सिक्रेट राहिली आहे. त्याच्या गर्लफ्रेंडबाबत खूपच कमी लोक जाणतात.
- केन विल्यमसनच्या गर्लफ्रेंडचे नाव सारा रहीम आहे. ती मूळची ब्रिटिश असून, प्रोफेशनने नर्स आहे. 
- हे कपल तेव्हा चर्चेत आले जेव्हा या दोघांना SEA BEACH वर हॉलिडेला गेल्याचे पाहिले. 
- जानेवारी, 2016 मध्ये केन आपल्या गर्लफ्रेंडसोबत न्यूझीलंडमधील तॉरंगा बीचवर स्पॉट झाला होता. 
- मात्र, त्यानंतरही केन मीडियाशी आपल्या रिलेशनशिपबाबत कधीच काही बोलला नाही.

 

अवॉर्ड नाईटमध्ये दिसले होते एकत्र-

 

- केन आणि सारा फेब्रुवारी 2016 मध्ये ऑकलंडमध्ये झालेल्या अवॉर्ड सेरेमनीदरम्यान एकत्र दिसले होते.
- या सेरेमनीमध्ये न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केनला बेस्ट स्पोर्ट्समॅन ऑफ द ईयर हा अवॉर्ड दिला होता.
- हा अवॉर्ड घेण्यासाठी तो आपली गर्लफ्रेंड सारासोबत आला होता. तेव्हाच ही बातमी कन्फर्म झाली की सारा ही केनची गर्लफ्रेंड आहे.

 

कॅल्क्युलेटिंग जीनियस म्हणून केनची ओळख- 

 

- न्यूझीलंड टीमचा कर्णधार केन विलियम्सन हा अाजच्या घडीला जगातील सर्वाेत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानला जाताे. 
- मॅक्ल्युमच्या निवृत्तीनंतर न्यूझीलंड टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी त्याच्याकडे साेपवण्यात अाली.
- केनची तुलना ही भारताचा स्टार विराट काेहलीशी केली जाते. मात्र, ताे कधीही स्वभावात विराटसारखा अाक्रमक दिसत नाही. मात्र, मैदानावर अव्वल कामगिरी करण्यात ताे विराटसारखाच तरबेज अाहे. 
- केनने वयाच्या 20 व्या वर्षी अहमदाबाद येथे भारतविरुद्ध सामन्यातून अांतरराष्ट्रीय कसाेटीत पदार्पण केले हाेते. यात त्याने 131 धावांची शानदार खेळी केली हाेती. 
- मैदानावरील सरस फलंदाजीसारखीच विलियम्सनची शैक्षणिक प्रगतीही काैतुकास्पद अाहे. ताे अभ्यासातही सरस अाहे. 
- यामुळेच त्याला कॅल्क्युलेटिंग जीनियस नावाने अाळेखले जाते. यामुळे त्याला अंतिम वर्षात ‘हेड परफेक्ट’ पुस्तक देऊन गाैरवण्यात अाले हाेते.

 

स्पोर्ट्सचा वारसा घरातूनच-

 

- केन विलियम्सनला खेळाचे संस्कार हे घरातूनच मिळाले अाहे. त्याचे वडील हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळले अाहेत. 
- त्याची अाई बास्केटबाॅलपटू हाेती. याशिवाय त्याच्या दाेन्ही बहिणी व्हाॅलीबाॅलपटू राहिल्या अाहेत. 
- त्याला एक जुळा भाऊदेखील अाहे. ताे अापला भाऊ लाेगानच्या नंतर काही मिनिटांनंतर जन्माला अाला. हे दाेन्ही भाऊ रग्बी, बास्केटबाॅल अाणि सर्फिंगमध्ये तरबेज अाहेत.
- सचिन हा या दाेघांचाही लहानपणापासूनचा अावडता खेळाडू अाहे. त्यामुळे त्याच्यासारखे हाेण्यासाठी विलियम्सनने क्रिकेटचा छंद जाेपासला अाहे. 
- तसेही जुळे भाऊ-बहीण हे अापसात अनेक वेळा भांडतात. मात्र, हे दाेघे भाऊ कधीही भांडत नाहीत. एकमेकांना प्रेरणा देण्याचे ते काम करतात. 

 

सामाजिक कार्यातही केनचा सहभाग-

 

- विलियम्सन हा किवी टीमचा कर्णधार म्हणून अाणि सामाजिक कार्यात सहभागी हाेणारा सरस खेळाडू म्हणून अाेळखला जाताे. 
- पेशावर येथे शाळावरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने पाकमध्ये खेळताना मिळालेला सर्व सामनानिधी हा यातील जखमींना दिला हाेता. 
- याशिवाय ताे अनेक वेळा पैसे दान करत असल्याचे दिसते. 

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, केन विल्यमसन आणि त्याची गर्लफ्रेंड साराचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...