आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Mohammad Shami Gets Clean Chit From Inquiry Of BCCI In Fixing Allegations

शमीला दिलासा : चौकशीत सिद्ध झाले नाही फिक्सिंगचे आरोप, IPL मध्ये खेळू शकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज मोहम्मद शमी आता देशासाठी आणि आयपीएलमध्ये खेळू शकणार आहे. गुरुवारी सायंकाळी BCCI च्या अँटी करप्शन युनिटने कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेटर्सला रिपोर्ट सादर केला. त्यात म्हटले आहे की, शमीच्या विरोधात मॅच फिक्सिंगचे काहीही पुरावे नाहीत. त्यामुळे या प्रकरणीस त्याच्यावर काहीही कारवाई करण्यात येऊ नये. त्यामुळे शमीचा बोर्डाबरोबरचा ग्रेड बीचा करार सुरू राहणार हे स्पष्ट झाले आहे. शमीची पत्नी हसीन जहाने त्याच्या विरोधात अनेक प्रकारचे गंभीर आरोप लावण्यात आले होते. त्यात इतर महिलांशी संबंधित आणि इतर प्रकरणांत पैसे घेतल्याच्या मुद्द्याचा समावेश होता. त्यानंतर बीसीसीआयने शमीला प्लेयर्सच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर मॅच फिक्सिंगच्या आरोपांची चौकशी अँटी करप्शन युनिटकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


पत्नीने लावला होता मॅच फिक्सिंगचा आरोप 
- शमीची पत्नी हसीन जहाने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आरोप केला होता की, शमी ने पाकिस्तानी मुलीकडून पैसे घेतले आहेत आणि तो देशाला धोकाही देऊ शकतो. 
- हसीनने म्हटले होते, अलिश्बा पाकिस्तान कराचीची मुलगी आहे. शमी तिला बोलावत असतो, तिच्यासाठी रूम बूक करतो. तिच्याशी संबंध ठेवतो. शमीने सांगितले होते की, अलिश्बाने त्याला पैसे दिले. ते युकेतील मोहम्मद भाई यांनी अलिश्बाच्या माध्यमातून पाठवले. पण कशाचे पैसे, नेमके काय हे काहीही सांगितले नाही. शमीने याबाबत कधीही काहीही सांगितले नाही. 


CoA ने दिले होते चौकशीचे आदेश 
- CoA ने शमीवर मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसीयूला पत्र लिहिले होते. चीफ विनोद राय यांनी ACU चे प्रमुख नीरज कुमार यांना शमीवर लावलेल्या आऱोपांची चौकशी करून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचा ई-मेल केला होता. 
- राय यांनी म्हटले होते, मीडिया रिपोर्ट्सनुसार शमीवर अनेक आरोप होत आहेत. सीओए यांनी शमी आणि त्याची पत्नी यांच्यात टेलिफोनवर झालेल्या चर्चेचती रेकॉर्डिंगही ऐकली. त्यात केवळ शमीने पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेतल्याचा उल्लेख असलेल्या भागाबद्दल सीओएंना काळजी असल्याचे म्हटले आहे. 
- राय यांनी एसीयू प्रमुख यांना मोहम्मद भाई आणि अलिश्बा नावाच्या व्यक्तींची ओळख पटवून शमी बरोबरच्या संबंधांची चौकशीही करण्यास सांगितले आहे.