आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कैफची निवृत्ती! म्हणाला, नाबाद 148 नंतर संघातून का काढले हे सांगणारे कोणीतरी हवे होते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेटमध्ये खास स्थान असलेल्या मोहम्मद कैफने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कैफने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. नेटवेस्ट सिरीजमध्ये इंग्लंडला पराभूत करून ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्याच्या घटनेला शुक्रवारी 16 वर्षे झाली. निवृत्ती जाहीर करण्यासाठी यापेक्षा योग्य दिवस असू शकत नाही, असे कैफने म्हटले आहे. 

 

मोहम्मद कैफची क्रिकेटमधून निवृत्ती, 'ट्विट' करून व्यक्त केली अन्याय झाल्याची खंत

कैफ विश्व कप 2003 में फाइनल खेलने वाली भारतीय टीम का भी हिस्सा थे. युवराज सिंह के साथ वह अंडर 19 क्रिकेट से चमके थे. उत्तर प्रदेश के लिए रणजी ट्रॉफी जीतने वाले कैफ ने आखिरी प्रथम श्रेणी मैच छत्तीसगढ के लिए खेला था. उन्होंने लिखा कि नेटवेस्ट ट्राफी में मिली जीत को वीरवार को 16 साल हो गए हैं और इस दिन मैं खेल से संन्यास ले रहा हूं. मैं भारत के लिये खेलने का मौका दिए जाने के लिए बोर्ड का शुक्रगुजार हूं

सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मधल्या फळीतील उत्तम फलंदाज असलेल्या कैफने 13 टेस्ट, 125 वनडे सामने खेळले. त्याने लॉर्डसवर 2002 मध्ये नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 87 धावांची मॅचविनिंग खेळी खेळली होती. 13 टेस्टमध्ये 32च्या सरासरीने 2753 धावा काढल्या. तर 125 वनडेमध्ये त्याची सरासरी 32 राहिली. यापूर्वीच क्रिकेट कमेंटेटरच्या रूपातही त्याने करिअरची नवी वाट चोखाळलेली आहे. ट्विट करून त्याने आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्याने देशासाठी अखेरचा सामना 12 वर्षांपूर्वी खेळला होता. या ट्विटमध्येच त्याने आपल्याविरुद्ध अन्याय झाल्याची भावनाही व्यक्त केली.


कैफने सोशल मीडियावर जारी केलेल्या पत्रात लिहिले की, मला भारतासाठी आणखी सामने खेळायचे होते. अशी एखादी व्यवस्था पाहिजे होती, ज्यात एका 25 वर्षीय उमद्या तरुणाला जवळ बसून हे सांगितले जाईल की, विंडीजमध्ये नाबाद 148 धावांची खेळी केल्यानंतरही पुढच्याच सिरीजमधून त्याला का वगळले जाते. 


कैफने या निमित्ताने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविडसह त्याचे आई वडील, भाऊ, पत्नीसह त्यांच्या करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या सर्वांचे आभार मानले. 

 

बातम्या आणखी आहेत...