आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL11: राेहितने पुण्यात राेखली चेन्नई एक्स्प्रेस, मुंबई इंडियन्‍सचा 8 गड्यांनी शानदार विजय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - तुफानी फलंदाजीच्या बळावर राेहित शर्माने (नाबाद ५६) सलगच्या पराभवाची मालिका खंडित करताना अायपीएलमध्ये गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सला शानदार विजय मिळवून दिला. त्याच्या झंझावाती नाबाद अर्धशतकाच्या बळावर मुंबई  संघाने अापल्या सातव्या सामन्यात यजमान चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. मुंबईने ८ गड्यांनी पुण्याच्या मैदानावर विजयाची नाेंद केली. मुंबईचा स्पर्धेतील हा दुसरा विजय ठरला.


सुरेश रैनाच्या (७५) अर्धशतकाच्या अाधारे चेन्नई सुपरकिंग्जने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमाेर विजयासाठी १७० धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात मुंबई संघाने दाेन गड्यांच्या माेबदल्यात दाेन चेंडू राखून लक्ष्य गाठले. संघाच्या विजयात कर्णधार राेहित शर्मासह सलामीवीर सूर्यकुमार यादव (४४) लेव्हिस (४७) अाणि हार्दिक (नाबाद १३) यांनी माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे मुंबईला पाच पराभवांनंतर लीगमध्ये दुसऱ्या विजयाची नाेंद करता अाली. यासह मुंबईने गुणतालिकेत चार गुणांच्या अाधारे सहाव्या स्थानावर धडक मारली. धाेनीच्या चेन्नई संघाचा लीगमधील हा दुसरा पराभव अाहे. 

 

सामनावीर राेहित : मुंबईला विजयी ट्रॅकवर अाणण्यासाठी राेहितने पुण्याच्या मैदानावर तुफानी खेळी केली. त्याने ३३ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार व २ षटकारांसह  नाबाद ५६ धावा काढल्या. हे त्याचे स्पर्धेतील दुसरे अर्धशतक ठरले. 

 

पुढील स्लाईडवर पहा,सामन्याचे धावफलक.... 

बातम्या आणखी आहेत...