आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअाॅकलंड- यजमान न्यूझीलंडने अापल्या घरच्या मैदानावर गाेलंदाजांच्या उल्लेखनीय खेळीच्या बळावर पाहुण्या इंग्लंडला सलामीच्या कसाेटीत सामन्यात धूळ चारली. न्यूझीलंडने साेमवारी डाव अाणि ४९ धावांनी कसाेटीत शानदार विजयाची नाेंद केली. ट्रेंट बाेल्ट (३/६७), नील वेग्नर (३/७७) अाणि टाेड एस्ले (३/३९) यांंनी न्यूझीलंडला शानदार विजय मिळवून दिला. खडतर अाव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या डावात अवघ्या ३२० धावांवर गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे इंग्लंडचा सामना ड्राॅ करण्याचा प्रयत्न अपुरा ठरला. इंग्लंडला या कसाेटीत सुमार खेळीचा माेठा फटका बसला. फलंदाजांच्या अपयशामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. यजमानांच्या गाेलंदाजांची घरच्या मैदानावरील कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यामुळे इंग्लंडचा विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला.
या विजयासह न्यूझीलंडच्या टीमने दाेन कसाेटी सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील दुसऱ्या अाणि निर्णायक कसाेटीला ३० मार्चपासून सुरुवात हाेईल. सलामी कसाेटीत एकूण ९ बळी घेणार ट्रेंट बाेल्ट सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अाता अागामी निर्णायक कसाेटीतही सरस खेळी करून टीमला मालिका विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल.
इंग्लंडने तीन बाद १३२ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. डेव्हिड मालानने चार धावांची भर घातली अाणि ताे पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने २३ धावांचे याेगदान दिले. त्याला माेठी खेळी करता अाली नाही.
ट्रेंट बाेल्टचा धक्का
यजमान न्यूझीलंडकडून ट्रेंट बाेल्टची कामगिरी सरस ठरली. त्याने दाेन्ही डावांत टिच्चून गाेलंदाजी करताना इंग्लंड टीमची दाणादाण उडवली. त्याने दुसऱ्या डावात ६७ धावा देताना तीन विकेट घेतल्या. तसेच त्याने पहिल्या डावात ६ विकेट घेऊन इंग्लंडचा खुर्दा उडवला हाेता.
बेन स्टाेक्सची झुंज व्यर्थ
पराभव टाळण्यासाठी बेन स्टाेक्सने एकाकी झुंज दिली. त्याने सामना ड्राॅ करण्याचाही माेठा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपेक्षित अशी कामगिरी करता अाला नाही. त्याने १८८ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकारांसह ६६ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने करिअरमध्ये शानदार कसाेटी अर्धशतक साजरे केले. याशिवाय त्याने ब्रेयरस्ट्राेसाेबत ३९ अाणि माेईन अलीसाेबत ३६ धावांची भागीदारी रचली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.