आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - श्रीलंकेतील निदहास ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा विकेटकिपर बॅट्समन दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारताचा चॅम्पियन बनवले. त्यानंतर तो एका रात्रीत स्टार बनला. त्याची तुलना धोनीबरोबर झाली. तो धोनीसारखा फिनिशर आहे असे म्हटले गेले. पण कार्तिकला मात्र तसे वाटत नाही. त्याचे म्हणणे आहे की, धोनी टॉपर आहे, पण मी अजून विद्यार्थीच आहे.
म्हणाला तुलना चुकीची..
चेन्नईत माध्यमांशी बोलताना कार्तिक म्हणाला, दिनेश कार्तिकचे म्हणणे आहे की, 'धोनीचा विषय असेल तर मी सांगू इच्छितो की, ज्या शाळेचा तो टॉपर राहिला आहे, त्या शाळेत अजून मी शिकतच आहे. तो असा क्रिकेटपटू आहे, ज्याला मी पाहत आलो आहे. त्याच्याबरोबर तुलना योग्य नाही. पण विशेष म्हणजे कार्तिक डेब्यूचा विचार करता धोनीपेक्षा सिनिअर आले.
4 महिन्यांच्या फरकाने केला डेब्यू
- 32 वर्षांच्या कार्तिकने सप्टेंबर 2004 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान डेब्यू केला होता. तर धोनीने त्यानंतर तीन महिन्यांनी बांगलादेशच्या विरोधात झालेल्या मालिकेत पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळा होता.
- डेब्यूनंतर 14 वर्षात धोनी भारताचा रेग्युलर विकेटकीपर आणि यशस्वी क्रिकेटपटू बनला. तर धोनी मात्र संघात आत बाहेर होत राहिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.