आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेची विजयी सलामी, धवनची खेळी व्यर्थ; भारताचा उद्या बांगलादेशविरुद्ध सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलंबाे- बलाढ्य  टीम इंडियाविरुद्धची पराभवाची मालिका खंडित करताना यजमान श्रीलंकेने मंगळवारी टी-२० तिरंगी मालिकेत शानदार विजयी सलामी दिली. श्रीलंकेने सलामी सामन्यात भारतावर ५ गड्यांनी मात केली. यासह टीमने मालिकेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. पहिल्यांदाच तिरंगी मालिकेत खेळणाऱ्या भारताला सलामीलाच पराभवाचा सामना करावा लागला. 


सामनावीर कुशल परेराच्या (६६) अर्धशतकाच्या बळावर श्रीलंकेने १८.३ षटकांत सामना जिंकला. शिखर धवनच्या (९०)झंझावाती अर्धशतकाच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ गड्यांच्या माेबदल्यात १७४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने ५ गड्यांनी लक्ष्य गाठले. अाता श्रीलंकेचा दुसरा सामना शनिवारी बांगलादेशविरुद्ध हाेईल. 


यजमान श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गाेलंदाज चामिरा अाणि फर्नांडाेने अापल्या टीमचा कर्णधार दिनेश चांदिमलचा हा निर्णय याेग्य ठरवला. या दाेघांनी टीम इंडियाच्या दाेन विकेट घेतल्या.  कर्णधार राेहित शर्मा (०) व सुरेश रैना (१) स्वस्तात बाद झाले.  त्यानंतर धवनला मनीष व ऋषभची माेलाची साथ मिळाली. 

 

धवनची खेळी व्यर्थ
स्वस्तात दाेन विकेट पडल्याने भारतीय संघ सुरुवातीला अडचणीत सापडला. मात्र, शिखर धवनने एकाकी झंुज देताना संघाचा डाव सावरला.  त्याने ४९ चेंडूंचा सामना करताना ९० धावांची खेळी केली.  त्याने प्रत्येकी सहा चाैकार व षटकार ठाेकले.  त्याने  धावसंख्येला गती दिली. त्याने श्रीलंकेच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक...

बातम्या आणखी आहेत...