आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाज भारत-बांग्‍लादेश टी-20 सामना, विजयी हॅट्ट्रिक नोंदवून टीम इंडिया गाठणार अंतिम फेरी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलंबाे - सलगच्या दाेन विजयांनी फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता टी-२० तिरंगी मालिकेच्या फायनलमधील प्रवेशासाठी सज्ज झाला अाहे. भारत अाणि बांगलादेश यांच्यामध्ये बुधवारी मालिकेत सामना हाेणार अाहे. यात बाजी मारून विजयी हॅट्ट्रिकसह टीम इंडियाला या मालिकेच्या अंतिम फेरीतील अापला प्रवेश निश्चित करता येईल.

 

यावर भारताच्या युवांची नजर लागली अाहे. दुसरीकडे यजमान श्रीलंकेला नमवल्याने बांगलादेशच्या युवांचा अात्मविश्वास दुणावला. त्यामुळे भारताला अाता विजयासाठी माेठी मेहनत घ्यावी लागण्याचे चित्र अाहे.

 

मात्र, युवांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर हा सामना जिंकण्याचा कर्णधार राेहित शर्माला विश्वास अाहे. भारताने सलगच्या दाेन विजयाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले अाहे. दुसरीकडे श्रीलंकेला सलग दुसऱ्या पराभवाला सामाेरे जावे लागले. बांगलादेशचा संघ एका विजयासह गुणतालिकेत तळात तिसऱ्या स्थानावर अाहे.

 

जयदेव, शार्दूल फाॅर्मात
भारताचे युवा गाेलंदाज जयदेव उनाडकत, शार्दूल ठाकूर, विजय शंकर, यजुवेंद्र चहलही फाॅर्मात अाहे. त्यांनी सरस खेळीच्या बळावर संघाच्या विजयात अातापर्यंत माेलाचे याेगदान दिले. गत सामन्यात शार्दूलची गाेलंदाजी धारदार ठरली. त्याने गत सामन्यात चार विकेट घेतल्या हाेत्या. तसेच श्रीलंकेविरुद्ध जयदेवनेही धारदार गाेलंदाजी केली.

 

बांगलादेश टीम सज्ज
यजमान श्रीलंका टीमवरील विजयाने बांगलादेशचे खेळाडू फाॅर्मात अाले अाहेत. अाता सलग दुसऱ्या विजयाची टीमला अाशा अाहे. भारतविरुद्ध सामन्यातील विजयाने बांगलादेशच्या टीमलाही फायनलमधील अापला प्रवेशाचा दावा अधिक मजबूत करता येईल. मात्र, यासाठी टीमला सरस खेळीची गरज अाहे.

 

संभाव्य संघ
भारत : राेहित शर्मा (कर्णधार), धवन,  राहुल, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, दीपक हुडा, वाॅशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव, माे. सिराज, ऋषभ पंत.
बांगलादेश : महमुद्दुल्लाह (कर्णधार), तमीम, साैम्य सरकार, इम्रुल कायेस, मुस्तफिजूर रहमान, मुशफिकूर रहिम, रुबेल हुसैन, तस्कीन, हैदर, अबु जायेद, अरीफूल हक, नझमुल,हसन, लिटाेन.

बातम्या आणखी आहेत...