आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुबई- युवा खेळाडू यजुवेंद्र चहलने धारदार गाेलंदाजी करून टीम इंडियाला तिरंगी मालिकेची ट्राॅफी मिळवून देण्यात माेलाचे याेगदान दिले. याच धारदार गाेलंदाजीचा त्याला अायसीसीच्या क्रमवारीत माेठा फायदा झाला. यातूनच त्याने गाेलंदाजीच्या क्रमवारीत थेट दुसऱ्या स्थानावर धडक मारली. त्याने फायनलमध्ये तीन विकेट घेतल्या. यामुळे त्याला थेट १२ स्थानांनी प्रगती साधता अाली. चहलची कामगिरीही काैतुकास्पद ठरली. त्याला ७०६ रेटिंग गुणांची कमाई करता अाली. दुसरीकडे वाॅशिंग्टन सुंदरने १५१ स्थानांनी प्रगती साधली. यातूनच त्याला ३१ वे स्थान गाठता अाले. त्याने या मालिकेमध्ये एकूण अाठ विकेट घेतल्या. यातूनच त्याला क्रमवारीत ४९६ रेटिंग गुणांचा फायदा झाला. भारताने रविवारी बांगलादेशविरुद्ध फायनलमध्ये विजय संपादन केला. भारताने ४ गड्यांनी सामना जिंकला.
षटकार ठाेकून टीम इंडियाला विजय मिळवून देणाऱ्या दिनेश कार्तिकलाही क्रमवारीत फायदा झाला. त्याने ३१ स्थानांनी सुधारणा करताना टाॅप-१०० मध्ये धडक मारली. ताे अाता ९५ व्या स्थानावर अाला. अफगाणिस्तानचा राशीद खान अाणि न्यूझीलंडचा काेलीन मुन्राे अनुक्रमे गाेलंदाजी व फलंदाजीमध्ये नंबर वन बनले अाहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, टॉप-५ फलंदाज, टॉप-५ गोलंदाज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.