आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Under 20 World Athletics Championship : Hima Das Scripts History, Won Gold

वर्ल्ड ज्युनियर अॅथलेटिक्स: 400 मीटर शर्यतीत गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय ठरली हिमा, 51.46 सेकंदांत पूर्ण केली शर्यत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमाने 400 मीटर शर्यत 51.46 सेकंदांत पूर्ण केली.
या चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणारी पहिली भारतीय अॅथलीट बनली आहे हिमा.

 

फिनलँड - धावपटू हिमा दासने फिनलंडमध्ये सुरू असलेल्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन्स (आयएएफ) वर्ल्ड अंडर-20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या 400 मीटर ट्रॅक इव्हेंटच्या फायनलमध्ये गोल्ड मेडल जिंकले. या चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणारी ती पहिली भारतीय अॅथलिट बनली आहे. 18 वर्षीय हिमाने गुरुवारी 400 मीटर ट्रॅक इव्हेंट रेस 51.46 सेकंदांत पूर्ण केली. यापूर्वी बुधवारी सेमीफाइनलमध्येही तिने 52.10 सेकंदांत शर्यत पूर्ण केली होती. दुसरीकडे, पहिल्या राउंडमध्ये 52.25 सेकंदांचा वेळ घेतला होता. रोमानियाच्या अँड्रिया मिकलोसला रजत आणि अमेरिकेच्या टेलर मेन्सनला कांस्यपदक मिळाले.

 

हिमा आसामची रहिवासी आहे. गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये हिमाने ही रेस 51.31 सेकंदांत पूर्ण केली होती. ती 6व्या स्थानावर होती. यानंतर तिने सातत्याने आपल्या खेळात सुधारणा केली. काही दिवसांपूर्वी तिने आंतरराज्यीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. तेव्हा तिने 51.13 सेकंदांत शर्यत पूर्ण केली होती. हिमा आता भाला फेक खेळाडू नीरज चोपडाच्या एलीट क्लबमध्ये शामिल झाली आहे. नीरजने 2016 मध्ये पोलंडमध्ये आयोजित वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकून विश्वविक्रमही बनवला होता. यापूर्वी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये 2002 दरम्यान डिस्क थ्रोमध्ये सीमा पुनियाने कांस्य पदक जिंकले होते. तर 2014 मध्ये डिस्क थ्रोमध्ये नवजीत कौर ढिल्लोनेही कांस्य पदक आपल्या नावे केले होते.  

 

बातम्या आणखी आहेत...