आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काच्‍या डान्‍सवेळी विराटकडे फिरले होते कॅमेरे, अशी होती IPLची \'ती\' सेरेमनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्काचा परफॉर्म पाहताना विराट कोहली.... - Divya Marathi
अनुष्काचा परफॉर्म पाहताना विराट कोहली....

स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्‍या 11 व्‍या सीजनला आज (7 एप्रिल) पासून सुरूवात होत आहे. आज सायंकाळी मुंबईत ग्रॅंड ओपनिंग सेरेमनी सोहळा होत आहे. आजच्या ओपनिंग सेरेमनीत बॉलिवूड स्टार्स ऋतिक रोशन आणि प्रभूदेवा मुख्य आकर्षण असतील. त्यांच्यासोबत वरूण धवन, परिणिती चोप्रा, जॅकलीन फर्नांडिस परफॉर्म करणार आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजता ओपनिंग सेरेमनीचे आयोजन केले आहे. दीड तास हा सेरेमनी चालेल. यानंतर दोन्ही कर्णधार टॉस करतील. यानंतर त्याच रात्री आठ वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होईल. रोहित शर्मा आणि एमएस धोनी हेच केवळ दोन कर्णधार ओपनिंग सेरेमनीत सहभागी होतील. इतर कर्णधार आपापल्या संघासमवेत असतील.

 

गेल्या वर्षी (2017) अॅक्ट्रेस मलायका अरोरा आणि सुशांतसिंग राजपूतने परफॉर्म केले होते. या दोन्ही बॉलिवूड स्टार्सनी आपल्या खास डान्स परफॉर्मन्सने सर्वांना एंटरटेन केले होते. 2016 मध्ये झालेल्या ओपनिंग सेरेमनी इव्‍हेंटमध्‍ये बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ, रणवीर सिंग यांच्‍यासोबत जॅकलीन फर्नांडिस आणि योयो हनी सिंह सहभागी झाले होते. तर 2015 च्या ओपनिंग सेरेमनीत विराटची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा केंद्रस्थानी होती. 2015 चा ओपनिंग सेरेमनीचा असा थाट..

 

- 2015 मध्‍ये IPL 8 चा ओपनिंग सेरेमनी कोलकाताच्‍या सॉल्ट लेक स्टेडियमवर झाला होता.
- बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने या सोहळ्याला होस्ट केले होते.
- IPL 8 च्‍या ओपनिंग सेरेमनीमध्‍ये अनुष्का शर्मा, रितिक रोशन, शाहिद कपूर आणि फरहान अख्तर यांनी परफॉर्म दिला होता.

 

विराट-अनुष्काची होती चर्चा..

 

- ओपनिंग इव्‍हेंटच्या काहीच दिवस आधी अनुष्का शर्मा आणि विराट यांची लव्‍ह स्‍टोरी चर्चेत आली होती.
- त्यामुळे परफॉर्मन्ससाठी अनुष्का जेव्हा स्टेजवर आली तेव्‍हा सर्व कॅमेरे विराटकडे वळले होते.
- तेव्‍हा अनुष्काचा परफॉर्मन्स पाहून विराट हसताना दिसला होता.

 

सैफच्‍या अॅंकरिंगची उडवली होती खिल्‍ली..

 

- कार्यक्रमात अँकरिंग करताना सैफकडून काही चुका झाल्‍या होत्‍या.
- सोशल मीडियावर सैफची चांगलीच खिल्‍ली उडवण्‍यात आली होती.
- सैफने अँकरिंग करताना चुकीचे नावं घेतली होती.

 

पुढील स्‍लाईड्सवर पाहा, 2015 च्‍या ओपनिंग सेरेमनीत अनुष्काचा असा होता थाट....

बातम्या आणखी आहेत...