आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा : झंझावाती द्विशतक ठाेकणारा वसीम जाफर पाचवा सर्वात वयस्कर खेळाडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- रणजी चॅम्पियन विदर्भ संघाच्या अनुभवी फलंदाज वसीम जाफरने (२८५)  गुरुवारी इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत विक्रमी कामगिरीचा पल्ला गाठला. त्याने अापल्या घरच्या मैदानावर स्पर्धेत करुण नायरच्या शेष भारतविरुद्ध सामन्यात नाबाद द्विशतक ठाेकले. यासह ताे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये झंझावाती द्विशतक ठाेकणारा भारताचा पाचवा वयस्कर फलंदाज ठरला. या खेळीदरम्यान त्याने शेष भारताच्या युवा गाेलंदाजीचा खरपुस समाचार घेतला. त्यामुळे त्याला हा विक्रमी धावांचा पल्ला गाठता अाला. तसेच त्याचे फर्स्ट क्लास करिअरमधील हे अाठवे द्विशतक ठरले.    


विदर्भ टीमच्या ४० वर्षीय जाफरने याशिवाय या सामन्यात अनेक उल्लेखनीय कामगिरीची नाेंद केली. या द्विशतकाच्या बळावर विदर्भाने गुरुवारी शेष भारताविरुद्ध दुसऱ्या दिवशी ३ बाद ५९८ धावांचा डाेंगर रचला. यादरम्यान सतीशनेही (१२०) शानदार शतकाचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले. अाता अपूर्व वानखेडे नाबाद ४४ धावांसह खेळत अाहे. जाफरने ४२५ चेंडूंचा सामना करताना ३४ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे नाबाद २८५ धावांची खेळी केली. या वेळी त्याला गणेश सतीने माेलाची साथ दिली. या दाेघांनी तुफानी फटकेबाजी करताना टीमच्या धावसंख्येला गती दिली.   


गाठला १८ हजार धावांचा पल्ला : प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना वसीम जाफरने १८ हजार धावांचा पल्ला गाठला. यात ५३ शतकांचा समावेश अाहे. यासह ताे अाता अशी कामगिरी करणारा भारताचा सहावा फलंदाज ठरला. यापूर्वी, सुनील गावसकर (२५,८३४), सचिन तेंडुलकर (२५,३९६), राहुल द्रविड (२३,७९४), व्हीव्हीएस लक्ष्मण (१९,७३०) अाणि विजय हजारे (१८,७४०) यांनीही हा पल्ला गाठला अाहे. अाता या दिग्गजांमध्ये जाफरने अापले स्थान निश्चित केले. 

 

सतीशसाेबत द्विशतकी भागीदारी 
रणजी चॅम्पियन विदर्भाच्या वसीम जाफरच्या अापल्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर दुसरा दिवस गाजवला. त्याने अापला सहकारी गणेश सतीशसाेबत द्विशतकी भागीदारी केली. या दाेघांची तिसऱ्या विकेटसाठीची ही माेठी भागीदारी ठरली. दरम्यान, गणेश सतीने शतकाचे याेगदान दिले.   

 

 

मुरलीला टाकले मागे 
विदर्भाच्या अाघाडीचा फलंदाज वसीम जाफरने इराणी चषकात सर्वाधिक २८५ धावांची खेळी केली. त्याची ही या स्पर्धेतील सर्वाेत्तम अाणि सर्वाधिक धावांची खेळी ठरली. यादरम्यान त्याने मुरली विजयला मागे टाकले. मुरलीच्या नावे २६६ धावांच्या वैयक्तिक धावांची नाेंद हाेती. 

 

 पुढील स्‍लाइडवर पाहा, सर्वात वयस्कर द्विशतकवीर... 

बातम्या आणखी आहेत...