Home | Sports | From The Field | 35 Years of Historical qricket world cup win of India

हाच तो क्षण ज्यामुळे आपल्याला मिळाले सचिन, सौरव.. ऐतिहासिक विजयाची 35 वर्षे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 25, 2018, 11:51 AM IST

भारताच्या या पहिल्या विश्वचषक विजयानेच सचिन, सौरव यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटुंना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.

 • 35 Years of Historical qricket world cup win of India

  25 जूनचा दिवस भारतीय क्रिकेटच्‍या इतिहासातील सर्वात संस्‍मरणीय असा दिवस आहे. 1983 मध्‍ये याच दिवशी कपिल देवच्‍या धुरंधरांनी क्रिकेटमधील त्‍यावेळची दबंग टीम वेस्‍ट इंडीजला पराभवाचे पाणी पाजून विश्‍वचषक आपल्‍या नावे केला होता. त्‍यानंतर जरी टीम इंडियाने धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली विश्‍वचषक जिंकला असला तरी पहिल्‍या विजयाची सर त्‍याला येणार नाही. कारण भारताच्या या पहिल्या विश्वचषक विजयानेच सचिन, सौरव यांच्यासारख्या दिग्गज क्रिकेटपटुंना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली होती.


  कुणाच्‍याही ध्‍याणीमणी नव्‍हते, की सलग तीन वेळेस विश्‍वचषक जिंकलेल्‍या वेस्‍ट इंडिजला भारत पराभूत करेल. वेस्‍ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ 54.4 षटकात 183 धावा करु शकला(पूर्वी एकदिवसीय सामना 60 षटकांचा खेळला जायचा) गॅरी सोबर्सने तीन विकेट मिळविल्‍या होत्‍या.


  पुढील स्लाइड्सवर..1983 च्‍या विश्‍वचषकातील काही खास पैलूंवर टाकुयात एक नजर...

 • 35 Years of Historical qricket world cup win of India

  भारतीय संघाच्‍या फलंदाजीला टार्गेट केल्‍यास सहज विजय होईल, असा विश्‍वास वेस्‍ट इंडीजचा कर्णधार क्‍लाईव्‍ह लॉईड याला होता. युवा गोलंदाज विन्‍सटन डेव्हिसने ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या उपांत्‍य सामन्‍यात 7 विकेट टिपले होते. परंतु, कर्णधार लॉयडने डेव्हिसऐवजी अनुभवी जोएल गार्नरला खेळवले. लॉयडच्‍या अपेक्षेनुसार भारतीय फलंदाजी फ्लॉप झाली. के.श्रीकांत 38 आणि संदीप पाटीलच्‍या 27 धावांच्‍या महत्‍वपूर्ण खेळमुळे भारताला 183 धावा करता आल्‍या. भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्‍यासाठी वेस्‍ट इंडीजच्‍या लॅरी गोम्‍स आणि व्हिवियन रिचर्ड्सला षटकांच्‍या मधेमधे गोलंदाजी देण्‍यात येत होती. श्रीकांत, संदीप पाटील आणि मदन लाल यांनी स्‍वीप शॉट खेळून यावर तोडगा काढला.


   

 • 35 Years of Historical qricket world cup win of India

  भारतीय फलंदाज मोहिंदर अमरनाथविरूद्ध टाकण्‍यात आलेला प्रत्‍येक चेंडू बाऊंसर होता. अमरनाथने सुमारे 80 बाऊंसर चेडूंचा सामना करताना तीन चौकारांच्‍या मदतीने 26 धावा बनवल्‍या होत्‍या.


   

 • 35 Years of Historical qricket world cup win of India

  भारतीय फलंदाज बलविंदर संधू लाल पगडीवर निळ्या रंगाचा हेल्‍मेट घालून मैदानावर आला होता. कॅरेबियन जलदगती गोलंदाज गार्नरच्‍या शॉर्ट पिच चेंडूने पहिलाच चेंडूवर त्‍याची गाळण उडाली. चेंडू सरळ जाऊन संधूच्‍या डोक्‍याला लागला. कॅरेबियन विकेटकिपर दुजाँनने संधूची विचारपूस केली. पंरतु, संधूला त्‍याची भाषा समजू शकली नाही आणि तो रागाने लाल झाला. तो 11 धावांवर नाबाद राहिला. संधूने या बाऊंसरचा बदला घेताना सलामी फलंदाज गॉर्डन ग्रिनीजचा फक्‍त 1 चेंडूवर त्रिफळा उडवला. पाच धावांवरच त्‍यांची पहिली विकेट पडली. त्‍यानंतर आलेल्‍या डेसमंड हेन्‍स आणि व्हिवियन रिचर्ड्सने डाव सांभाळला.


   

 • 35 Years of Historical qricket world cup win of India

  कपिल देवच्‍या बनाना स्विंग आणि संधूच्‍या नव्‍या चेंडूवरच्या गोलंदाजीला तोंड देणे कॅरेबियन फलंदाजांना जमले नाही. संधूने 32 धावांत 2 गडी टिपले. कर्णधार कपिल देवने आपल्‍या 11 षटकांच्‍या गोलंदाजीमध्‍ये 4 षटके निर्धाव टाकली आणि त्‍याचबरोबर अँडी राबर्ट्सला बाद केले.


   

 • 35 Years of Historical qricket world cup win of India

  कॅरेबियन कर्णधार क्‍लाईव्‍ह लॉयडला पहिली धाव घेताच मांसपेशी ताणल्‍या गेल्‍या होत्‍या. त्‍यानंतर हेयन्‍सला त्‍याने रनर घेतला. आणि 16 चेंडू खेळून काढली. यामध्‍ये त्‍याने 8 धावा केल्‍या.


   

 • 35 Years of Historical qricket world cup win of India

  टीम इंडियाकडून गोलंदाज मोहिंदर अमरनाथ आणि मदन लाल यांनी महत्‍वपूर्ण भूमिका निभावली. दोघांनी 3-3 गडी टिपले. मदन लालने हेयन्‍स, व्हिवियन रिचर्ड्स आणि लॅरी गोम्‍स सारख्‍या महत्‍वपूर्ण विकेट टिपल्‍या. त्‍यांच्‍या घातक गोलंदाजीसमोर फक्‍त 140 धावांत विंडीजचा संघ संपुष्‍टात आला. टीम इंडियाने विंडीजचा 43 धावांनी पराभव करून चषकावर आपले नाव कोरले.

   

   

 • 35 Years of Historical qricket world cup win of India

  अमरनाथने वेस्ट इंडीज फलंदाज मायकल होल्डिंगचा त्रिफळा उडविताच स्‍टेडियमध्‍ये उपस्थित असलेले हजारो भारतीय प्रेक्षक मैदानात उतरले होते. त्‍यांचा आनंद गगनात मावेनासा होता. कर्णधार कपिलसहित संपूर्ण भारतीय क्रिकेटपटूचे नाव क्रिकेटरसिकांच्‍या हृदयात कोरले गेले. त्‍यानंतर 2011 मध्‍ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय संघाने 'वर्ल्‍ड कप' जिंकला.

 • 35 Years of Historical qricket world cup win of India
 • 35 Years of Historical qricket world cup win of India
 • 35 Years of Historical qricket world cup win of India
 • 35 Years of Historical qricket world cup win of India

Trending