आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहलीच्या 11 डावांत 617 धावा; सचिनच्या 22 डावांत 553 धावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाेहान्सबर्ग- टीम इंडियाला शनिवारी यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध विजयाची लय कायम ठेवता अाली नाही. त्यामुळे अाफ्रिकेने चाैथ्या वनडेत भारतावर ५ गड्यांनी मात केली. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, याच सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीने एका वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने या सामन्यात ७५ धावांची खेळी केली. यासह अाता ताे अाफ्रिकेत यजमानांविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारा पहिला फलंदाज ठरला अाहे. यादरम्यान त्याने अाफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावांच्या विक्रमात सचिनलाही मागे टाकले. त्याने कमी डावात हा पल्ला यशस्वीपणे गाठला. सचिनने हा विक्रम २२ डावांत रचला हाेता. मात्र, काेहलीने  अवघ्या ११ डावांत या विक्रमाला मागे टाकले.   

 

विराट काेहलीने अाफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर ११ डावांत सर्वाधिक ६१७ धावा काढल्या. सचिनने २२ डावांत त्यादरम्यान सर्वाधिक ५५३ धावा काढल्या हाेत्या.   


शतकात सचिनपेक्षा सरस
यजमानांविरुद्ध सर्वाधिक शतकातही काेहली हा सचिनपेक्षा सरस ठरला. सचिनच्या नावे प्रत्येकी एका शतक व अर्धशतकाची नाेंद अाहे. काेहलीने २ शतक, ३ अर्धशतकांची  नावे नाेंद केली. त्याने ७७.१२ च्या सरासरीने हा पल्ला गाठला. सचिनची सरासरी २५.१३ हाेती. 


लग्नामुळे सहा वनडेला मुकला तरीही वेगवान खेळीने टाॅप स्काेअरर   
विराट काेहली हा ११ डिसेंबर राेजी बाॅलीवूडची सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शर्मासाेबत विवाहबद्ध झाला. त्यामुळे ताे श्रीलंकेविरुद्ध तीन वनडे अाणि तीन टी-२० सामन्यांना मुकला. यादरम्यान अनेक  देशांनी अांतरराष्ट्रीय सामने खेळले. लग्नानंतर काेहलीने अाफ्रिका दाैऱ्यातून अांतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने दाैऱ्यात तीन कसाेटी, चार वनडेमधील एकूण १० डावांत ६७९ धावा काढल्या. यातून काेहली हा लग्नानंतर शानदार कमबॅक करताना क्रिकेटच्या सर्वच फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला. त्याने स्मिथला (६०२) मागे टाकले. न्यूझीलंडचा मुन्राे या यादीत तिसऱ्या स्थानी अाहे. त्याने ११ डिसेंबर ते अाजपर्यंत ५३२ धावा काढल्या.  


अाता पीटरसनचा विक्रम ब्रेकवर नजर  
- ३९३ धावा काेहलीने अातापर्यंत या मालिकेतील चार सामन्यांत काढल्या. यासह ताे अाफ्रिकेविरुद्ध एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.  
- गतवेळचा भारतीय विक्रम  अझहरच्या नावे हाेता. त्याने १९९२-९३ मध्ये अाफ्रिकेतील मालिकेत २३२ धावा काढल्या.
- द.अाफ्रिकेतील मालिकेत केविन पीटरसन हा सर्वाधिक धावा काढणारा विदेशी फलंदाज अाहे. त्याने २००४-०५ मध्ये सात सामन्यांच्या मालिकेत ४५४ धावा काढल्या हाेत्या. या यादीत काेहली दुसऱ्या स्थानावर अाहे. 

बातम्या आणखी आहेत...