आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेहितच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध खेळणार; तीन वनडे सामन्यांची मालिका अाजपासून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाला- यजमान भारत अाणि श्रीलंका यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला रविवारपासून सुरुवात हाेत अाहे. या मालिकेतील सलामीचा सामना धर्मशालेच्या मैदानावर रंगणार अाहे. जबरदस्त फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडिया या मैदानावर खेळेल. नऊ महिन्यानंतर काेहलीच्या गैरहजेरीत भारतीय संघ या मैदानावर खेळत अाहे. याच सत्राच्या मार्चमध्येही काेहली हा येथील मैदानावर झालेल्या कसाेटीत सामन्यात खेळू शकला नव्हता.  त्यानंतर अाता पुन्हा याेगायाेगाने काेहलीने विश्रांती घेतली अाहे. 


कसाेटी मालिका विजयाने भारतीय संघ सध्या जबरदस्त फाॅर्मात अाहे. त्यामुळे अाता सलग वनडे सामने जिंकून मालिका अापल्या अापल्या नावे करण्याचा यजमानांच्या खेळाडूंचा मानस अाहे. 


विजयी माेहीम कायम ठेवण्याचे अाव्हान : टीम इंडियाने  श्रीलंकेविरुद्ध सलस १० सामने जिंकण्याचा विक्रम केला अाहे. अाता हीच विजयी लय कायम ठेवण्याचे  माेठे अाव्हान कर्णधार राेहितसमाेर अाहे. 

 

धाेनीच्या मार्गदर्शनाची रोहितला मिळेल मदत
अायपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या राेहित शर्माला अाता पहिल्यांदा राष्ट्रीय टीमच्या कर्णधारपदाची संधी मिळाली अाहे. त्यामुळे त्याला या मैदानावर खेळताना माजी कर्णधार महेंद्र सिंग धाेनीच्या मार्गदर्शनाची मदत मिळू शकते. फलंदाजीत राेहित, धाेनी, धवन, मनीष पांडे, लाेकेश राहुल, अजिंक्य रहाणेवर मदार असेल. सध्या शिखर धवन हा अाजारी अाहे. अशाच सलामीची संधी रहाणेला मिळू शकते.

 

केदारच्या जागी वाॅशिंग्टनला संधी

जखमी केदार जाधवच्या जागी युवा खेळाडू सुंदर वाॅशिंग्टनला संधी देण्यात अाली. अाता तामिळनाडूच्या या अाॅलराउंंडरवर सर्वांची नजर असेल. या संधीला सार्थकी लावण्यासाठी त्याला प्रयत्नशील राहावे लागणार अाहे.

 

नंबर वनची संधी : टीम इंडियाला  वनडेमध्ये नंबर वन हाेण्याची माेठी संधी अाहे. यासाठी टीमला अापल्या घरच्या मैदानावर श्रीलंकेचा सुपडासाफ करावा लागेल. ही  मालिका ३-० ने जिंकल्यास भारताला माेठा फायदा हाेईल.

 

संभाव्य संघ 
भारत :
राेहित शर्मा (कर्णधार), धवन,  रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, धाेनी, हार्दिक, कुलदीप, चहल, बुमराह, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ काैल.
श्रीलंका : तिसरा परेरा (कर्णधार), थिरीमाने, गुणतिलका, मॅथ्यूज, गुणारत्ने, डिकवेला, डिसिल्वा, अकिला धनंजया, लकमल, नुवान, समरविक्रमा, धनंजया डिसिल्वा, चमीरा, सचिथ पाथिराना, कुशल परेरा.

 

डिसेंबर २००९ मध्ये श्रीलंकेचा शेवटचा विजय 

पाहुण्या श्रीलंका टीमला भारत दाैऱ्यावर समाधानकारक कामगिरी करता अालेली नाही.  श्रीलंकेने डिसेंबर २००९ मध्ये अापला शेवटचा वनडे  जिंकला हाेता.

बातम्या आणखी आहेत...