आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यजमान अाफ्रिकेविरुद्ध विजयासाठी भारताचे संघ सज्ज! आज वनडे सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन/किंबर्ले- यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये शानदार विजयाची नाेंद करण्यासाठी भारताचा पुरुष अाणि महिला संघ सज्ज झाला अाहे. या दाेन्ही संघांचा वनडे सामना बुधवारी अाफ्रिकेविरुद्ध हाेणार अाहे. भारतीय महिला संघ यजमानांच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळणार अाहे. तर, काेहलीच्या नेतृत्वात भारताचा अाफ्रिकेविरुद्धचा हा तिसरा वनडे सामना अाहे. टीम इंडियाने सलगच्या दाेन विजयांच्या बळावर वनडे मालिकेत २-० ने अाघाडी घेतली अाहे. अाता विजयी हॅटट्रिकसह अाफ्रिकेत तिसरा सामना जिंकण्याची एेतिहासिक कामगिरी करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक अाहे. 


 विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली भारताने वनडे मालिकेत दमदार सुरुवात करताना सलग दाेन सामने जिंकले. त्यामुळे भारताला मालिकेत अापला दबदबा निर्माण करता अाला. अाता हीच लय कायम ठेवताना तिसऱ्या विजयाकडे भारताची नजर लागली अाहे.


झुलन, स्मृतीकडून अाशा

माजी कर्णधार झुलन गाेस्वामी अाणि महाराष्ट्राची युवा फलंदाज स्मृती मानधनाकडून भारतीय महिला संघाला दुसऱ्या वनडेत माेठ्या खेळीची अाशा  अाहे. या दाेघींचे सलामीच्या विजयात महत्त्वपूर्ण याेगदान राहिले अाहे.  

 

 दुखापतीने अाफ्रिका अडचणीत 
खेळाडूंच्या सातत्यपूर्व दुखापतीमुळे अाता यजमान अाफ्रिका संघ अडचणीत सापडला अाहे. यामुळे अाघाडीचे चार जायबंदी खेळाडू मालिकेतून बाहेर झाले अाहेत. त्यामुळे डेल स्टेन, डिकाॅक, डिव्हिलियर्स अाणि फाफ डुप्लेसिसच्या अनुपस्थितीत अाफ्रिका टीम तिसऱ्या वनडेत भारताच्या अाव्हानाचा सामना करणार अाहे. 

 

 

भारतीय महिलांना विजयी अाघाडीची संधी  
सलामीच्या विजयाने वर्ल्डकप फायनलिस्ट भारतीय महिलांचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. अाता दुसऱ्या वनडेतही बाजी मारून अाफ्रिकेवर मालिका विजयाची भारतीय संघाला संधी अाहे. यासह भारताला तीन वनडेच्या मालिकेत २-० ने विजयी अाघाडी घेता येईल.

 

यजुवेंद्र, कुलदीप यादव फाॅर्मात
 दुसऱ्या  विजयात यजुवेंद्र चहल व कुलदीप यादवने माेलाचे याेगदान दिले.यातील कामगिरीने हे दाेन्ही युवा गाेलंदाज फाॅर्मात अाहेत. त्यामुळे केपटाऊनच्या मैदानावरही या युवांकडून उल्लेखनीय कामगिरीची अाशा अाहे. चहलने दुसऱ्या वनडेत पाच विकेट घेतल्या.  

 

बातम्या आणखी आहेत...