आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- तमाम क्रिकेटविश्वाला हेवा वाटावा एवढ्या मोठ्या संख्येत आणि गुणवत्तेच्या बाबतीतही उत्तमोत्तम असे क्रिकेटपटू भारतात उदयाला येत आहेत. बीसीसीआयच्या योजनाबद्ध क्रिकेट प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे आणि यंत्रणेमुळे हे क्रिकेटपटू घडत आहेत, असे भारताचे माजी कर्णधार अाणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले. ते फारूख इंजिनिअर लिखित पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ‘काळा घोडा महोत्सवा’च्या एका कार्यक्रम पर्वात बोलत होते. क्रिकेटमध्ये पूर्वी संरक्षक आयुधे फारशी नव्हती तरीही दुखापती फारशा व्हायच्या नाहीत, मात्र हेल्मेटपासून सर्व तऱ्हेची संरक्षक आयुधे असतानाही दुखापतींचे प्रमाण वाढले आहे, मैदानावर मृत्यूही झाले आहेत.
अायुधामुळे शिथिलता
संरक्षक आयुधे नसताना फलंदाज अधिक सावध, चपळ असायचा. हेल्मेट आल्यापासून एका प्रकारची शिथिलता आली आहे. सुरक्षिततेची भावना फलंदाजाला नैसर्गिकरीत्या चेंडूवर जाताना किंचित संथ करते. याउलट पूर्वी एका, सहज सुलभतेने (नॅचरल इन्स्टिक्ट) नैसर्गिकरीत्या हातापायाची हालचाल पटकन व्हायची. डोळ्यात तेल घालून चेंडू पाहिला जायचा. असे भाष्य वेंगसरकर यांनी केले.
सर्वाधिक क्रिकेट युवांसाठी फायदेशीर
मुंबईच्या शंभराहून अधिक स्पर्धा आणि क्लब क्रिकेटमध्ये कसोटीपटूंसह सर्वच प्रमुख खेळाडूंचा होणारा सहभाग नवोदित क्रिकेटपटूंनाही मार्गदर्शक व लाभदायक ठरायचा, असेही त्यांनी सांगितले.
पन्नास रुपयांसाठी संयमी खेळी
आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे औचित्य साधून फारूख इंजिनिअर यांनी आपल्या खुमासदार आणि विनोदी शैलीच्या वक्तृत्वाने तमाम श्रोत्यांना सतत हसवले. ते म्हणाले, मी ‘ब्रीलक्रीम’ बॉय म्हणून ओळखला जातो. त्याकाळी त्या जाहिरातीचे दोन हजार पौंड मिळाले होते त्या वेळी प्रचंड रक्कम होती. कारण चौथ्या दिवशी सामना संपत आला की आम्ही तो संथ खेळून पाचव्या दिवशी न्यायचो. कारण एका दिवसाची बिदागी पन्नास रुपये अधिक मिळायची. आज मात्र पैशाला किंमत राहिली नाही. करोडो रुपये नवोदितांना, कसोटी खेळण्याआधीच मिळताहेत. देशासाठी खेळण्याचे मोल आणि स्वारस्य, महत्त्व राहिले नाही ही चिंतेची बाब आहे. मी आज वयाच्या ८०व्या वर्षीही भारतात, मायभूमीत येण्यास येथील लोकांमध्ये समरस होण्यास उत्सुक असतो. आम्हाला पैसे मिळाले नाहीत; परंतु देशाचे, देशवासीयांचे प्रेम भरपूर मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.