आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fans Trolls BCCI For Low Prize Money After U 19 World Cup Win Over Australia

युवीला 1 कोटी मग द्रविडला 50 लाख का, BCCI भिखारी कधी झाली?- फॅन्स बरसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- भारताच्या ज्यूनियर टीमने शनिवारी (3 फेब्रुवारी) अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. ही टूर्नामेंट जिंकल्यानंतर BCCI (भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड) ने टीमचे प्लेयर्स, कोच आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासाठी बक्षिसांची घोषणा केली. बोर्डाने टीममधील सर्व 16 खेळाडूंना 30-30 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तर, टीमला चॅम्पियन बनविणा-या कोच राहुल द्रविडला 50 लाख आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी 20-20 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. मात्र, या बक्षिसानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स थोडे ही खूष दिसले नाहीत. फॅन्सनी सोशल मीडियात कमेंट्स करत अंडर-19 टीमशी जोडलेल्या लोकांना घोषित केलेले हे प्राईज खूपच कमी असल्याचे सांगितले. यावरून त्यांनी BCCI ला चांगलेच फटकारले व श्रीमंत बीसीसीआय भिखारी कधी झाली असा सवाल केला. 

 

2007 साली एका षटकात सहा षटकार ठोकणा-या युवराज सिंगला 1 कोटी दिले. मग दहा वर्षानंतर ज्या राहुल द्रविडने भारताला वर्ल्ड कप जिंकून त्याला केवळ 50 लाख रूपये कसे देता? असा सवाल उपस्थित केला. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आता एवढे गरीब झाला असे सांगत किमान द्रविडला तरी जास्त रक्कम द्यायला हवी अशी भावना व्यक्त केली. द्रविडला 50 लाखांऐवजी किमान 1 कोटी रुपये तरी द्या असे त्यांचे म्हणणे आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बीसीसीआयवर फॅन्सनी कशा प्रकारे काढला राग....

बातम्या आणखी आहेत...