आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket Fans Trolls Rohit Sharma After Virta And Rahane Got Run Out Due To Him

पाचव्या वनडेत रोहितने शतक, यूजर्स म्हणाले, दोन बळी दिल्यानंतर गवसला फॉर्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- राेहितचे (११५) झंझावाती शतक अाणि कुलदीप यादवच्या (४/५७) धारदार गाेलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने मंगळवारी यजमान दक्षिण अाफ्रिकेवर मालिका विजय संपादन केला. भारताने मालिकेतील पाचव्या वनडेत अाफ्रिकेवर ७३ धावांनी मात केली. यासह भारताने सहा वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये ४-१ ने विजयी अाघाडी घेतली. राेहितने अाफ्रिकेच्या मैदानावर शानदार पहिले शतक साजरे केले. त्याचे हे करिअरमधील १७ वे वनडे शतक ठरले. त्याने १२६ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार व ४ षटकारांच्या अाधारे ११५ धावांची खेळी केली.

 

मात्र, असे असले तरी रोहित शर्माने शतक ठोकताना कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना धावबाद केले. रोहितच्या चुकीमुळे भारताने दोन बळी गेले. यानंतर फॅन्सनी सोशल मीडियात खूप खिल्ली उडविली. लोकांनी मजेदार कमेंट्स करताना रोहितने भारताचे दोन बळी देऊन फॉर्म घेतला अशी टीका केली.

 

पुडे स्लाईड्सद्वारे पाहा, विराट- रहाणे धावबाद झाल्यानंतर रोहितबाबत आलेल्या फनी कमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...