धाेनीने 320 वनडेत / धाेनीने 320 वनडेत गाठला 10 हजार धावांचा पल्ला; ठरला चाैथा भारतीय फलंदाज

Jul 15,2018 07:44:00 AM IST

लंडन - टीम इंडियाच्या माजी कर्णधार धाेनीने शनिवारी इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत ३७ धावांची खेळी केली. यासह त्याने वनडे करिअरमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. भारताच्या ३७ वर्षीय धाेनीने ३२० व्या वनडेत हा पल्ला गाठला.


टीम इंडियाचा मालिका विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. यजमान इंग्लंड संघाने दुसऱ्या वनडेत भारताचा ८६ धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडने तीन वनडेच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधली. तिसरा निर्णायक वनडे १७ जुलै रोजी रंगणार अाहे. प्रथम फलंदाज करताना इंग्लंडने ७ बाद ३२२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारताला ९ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारता अाली.

धाेनी ठरला चाैथा भारतीय फलंदाज
वनडे करिअरमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणारा धाेनी हा भारताचा चाैथा फलंदाज ठरला. त्याने ३२० व्या सामन्यात हे यश मिळवले. यापूर्वी भारताच्या माजी कर्णधार साैरव गांगुली, राहुल द्रविड अाणि सचिन तेंडुलकरने हा पल्ला गाठला अाहे.

X