आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

65 वर्षाच्या इम्रान खानचे तिसरे लग्न, अशी उडवली जातेय खुलेआम खिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि आता राजकीय नेता बनलेला इम्रान खानने तिसरे लग्न केले आहे. 65 वर्षाच्या इम्रानच्या पत्नीचे नाव बुशरा मेनका आहे. ती त्याची आध्यात्मिक गुरू सुद्धा आहे. काही दिवसापूर्वी हे वृत्त आले होते की, इम्रान तिस-या लग्नाच्या मूडमध्ये आहे आणि त्याने बुशराला प्रस्ताव दिला आहे. खरं तर, बुशराने इम्रानने म्हटले होते की, तिस-या लग्नानंतरच तू पाकिस्तानचा पंतप्रधान बनू शकशील. आता अशी उडतेय इम्रान खानची खिल्ली.....

 

- सोशल मीडियात माजी पाकिस्तानी क्रिकेटरची जोरदार खिल्ली उडविली जात आहे. फॅन्सने ट्विट केले की, इम्रानला जर कोणी सांगितले की चौथे लग्न कर मग तू अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनशील तरीही तो असे करेल.
- आणखी एका फॅनने ट्विट केले की, 'आपण तीन तलाकच्या भानगडीत अडकलो आहे आणि इम्रानने तिसरे लग्न केले आहे.'

- इम्रानने सर्वात आधी मूळची ब्रिटिश वंशाची जेमिमा गोल्डस्मिथसोबत लग्न केले होते. हे लग्न 1995 ते 2004 पर्यंत टिकले. त्याच्या दुस-या पत्नीचे नाव रेहम खान होते. रेहमसोबतचा त्याचा विवाह केवळ एक वर्ष (2015) टिकला.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इम्रान खानच्या तिस-या लग्नानंतर फॅन्स करत असलेल्या कमेंट्स....

बातम्या आणखी आहेत...