आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचवा टी-20 सामना; रोहितचे धमाकेदार अर्धशतक; भारताची फायनलमध्ये धडक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो- रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने पाचव्या सामन्यात बांगलादेशला १७ धावांनी पराभूत करत निदाहास ट्रॉफी टी-२० तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये प्रवेश केला.  प्रथम फलंदाजी करताना भारताने ३ बाद १७६ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश २० षटकांत ६ बाद १५९ धावा करू शकला. 


भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्माच्या फॉर्मची चिंता होती. अनेक दिवसांनंतर बुधवारी रोहितची बॅट तळपळी. त्याने तडाखेबंद खेळी करत अर्धशतक झळकावले. सलामीवीर रोहितने ६१ चेंडूंचा सामना करताना ८९ धावांची खेळी केली. त्याने ५ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचले. तो पहिल्या चेंडूपासून ते अखेरच्या चेंडूपर्यंत तो मैदानात टिकून राहिला. अखेरच्या चेंडूवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला. गोलंदाज रुबेल हुसैनीने चेंडू थेट यष्टीवर फेकत रोहितला बाद केले. दुसरा सलामीवीर शिखर धवनने चांगली सुरुवात करून दिली. त्याने २७ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकार खेचत ३५ धावा काढत कर्णधाराला साथ दिली. अखेरच्या षटकांत रैना बाद झाल्यावर आलेल्या यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक दोन धावांवर नाबाद राहिला.

 

मुशफिजुरचे अर्धशतक
बांगलादेशच्या मुशफिजुरने ५५ चेंडूंत ७२ धावा केल्या. तमीम इक्बालने २७ आणि शब्बीर रहेमानने २७ धावा जोडल्या. कर्णधार महमुदुल्लाह ११ धावा करून परतला. भारताच्या वॉशिंग्टन सुंदरने २२ धावांत ३ आणि सिराज, चहल, ठाकूरने प्रत्येकी एक गडी बाद केला. 

 

रोहित-रैनाची भागीदारी 

तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुरेश रैनाने आपल्या डावखुऱ्या फलंदाजीने सामन्यात रंगत आणली. त्याने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचली. रैनाने ३० चेंडूंत करत ५ चौकार व २ षटकार लगावत ४७ धावा ठाेकल्या. अवघ्या ३ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. त्याला रुबेल हुसैनीने सौम्य सरकारच्या हाती झेलबाद केले. तत्पूर्वी सलामी जोडी रोहित व धवनने  पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो आणि धावफलक...

बातम्या आणखी आहेत...