आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांगुलीला मागे टाकले; मैदानावर धावून 100 धावा काढणारा काेहली पहिला भारतीय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन- टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अापल्या झंझावाती खेळीला कायम ठेवताना एकापाठाेपाठ एका विक्रमाला गवसणी घालत अाहे. केपटाऊनच्या मैदानावर नाबाद शतकाच्या बळावर त्याने टीम इंडियाची यजमान अाफ्रिकेविरुद्ध विजयाची लय कायम ठेवली. भारताचा अाफ्रिकेतील हा विक्रमी सलग तिसरा विजय ठरला. यापूर्वी भारताला मालिकेत २-१ ने विजय संपादन करता अाला हाेता.   


दुसरीकडे काेहलीने नाबाद १६० धावांचे याेगदान दिले. यादरम्यान १२ चाैकार अाणि दाेन षटकारांच्या अाधारे ही खेळी केली. यामध्ये त्याने धावून १०० धावा काढल्या. यासह ताे अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला. तसेच त्याचा हा विक्रम ठरला. यामध्ये त्याने  गांगुलीला मागे टाकले. गांगुलीच्या नावे ९८ धावांची नाेंद अाहे. त्याने १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध हा पराक्रम केला हाेता. 

 

डिव्हिलियर्सला मागे टाकण्याची संधी 
काेहलीला शतकी लय कायम ठेवत अाफ्रिकेच्या डिव्हिलियर्सला (१३) सर्वाधिक शतकात मागे टाकण्याची संधी अाहे. त्याने गत वनडेत नाबाद शतक ठाेकले. यासह कर्णधाराच्या भूमिकेत त्याने सर्वाधिक १२ शतके ठाेकली. ताे अाता अाफ्रिकेविरुद्ध उर्वरित तीन वनडेतही खेळेल.

बातम्या आणखी आहेत...