आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेहित शर्माकडे नेतृत्व; काेहली, धाेनीसह पाच जणांना विश्रांती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दक्षिण अाफ्रिका दाैऱ्यात सलग दाेन मालिका विजयाची माेहीम फत्ते केल्याने टीम इंडियाचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. अाता हीच लय विजयी माेहीम श्रीलंकेतील तिरंगी मालिकेमध्येही कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. यासाठी राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अाता मिशन तिरंगी मालिका विजयाच्या इराद्याने श्रीलंकेचा दाैरा करणार अाहे. येत्या ६ मार्चपासून श्रीलंकेतील या टी-२० च्या तिरंगी मालिकेला सुरुवात हाेत अाहे. या मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची घाेषणा करण्यात अाली. या वेळी राेहितकडे टीमच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात अाली. 
 
तसेच शिखर धवनची उपकर्णधारपदी निवड झाली. टीमचा नियमित कर्णधार विराट काेहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीसह पाच जणांना विश्रांती देण्यात अाली. श्रीलंकेमध्ये प्रथमच क्रिकेटच्या छाेट्या टी-२० फाॅरमॅटची तिरंगी मालिका अायाेजित करण्यात अाली. यामध्ये यजमान श्रीलंका, भारतासह बांगलादेश टीमचा समावेश अाहे. भारताचा सलामी सामना यजमान श्रीलंका टीमशी हाेईल. या मालिकेची फायनल १८ मार्च राेजी प्रेमदासा मैदानावर रंगणार अाहे.   
 
टीम इंडिया प्रथमच या फाॅरमॅटच्या तिरंगी मालिकेमध्ये सहभागी हाेणार अाहे. दाैऱ्यात यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका २-१ ने जिंकल्याने भारतीय संघाचा अात्मविश्वास दुणावला अाहे. याचाच फायदा संघाला श्रीलंकेतील दाैऱ्यात निश्चितपणे हाेईल. युवांच्या बळावर अाता तिरंगी मालिका जिंकण्याचा कर्णधार राेहित शर्माचा मानस अाहे.   
 
यांची झाली खास निवड 
श्रीलंकेतील तिरंगी मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघामध्ये युवा वाॅशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, विजय शंकर, माेहंमद सिराज अाणि दीपक हुडाचा समावेश करण्यात अाला. अाता या नव्या युवा चेहऱ्यांकडून टीम इंडियाला श्रीलंकेतील मैदानावर उल्लेखनीय कामगिरीची अाशा अाहे.   
 
यांना मिळाली विश्रांती 
सातत्याने मैदानावर खेळत असल्याने भविष्यातील दुखापतीचा धाेका टाळण्यासाठी एम.एस.के. प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली निवड समितीने काहींना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भुवनेश्वरकुमार, महेंद्रसिंग धाेनी, कुलदीप यादव अाणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश अाहे. कंबरेच्या दुखापतीमुळे कर्णधार विराट काेहलीने यापूर्वीच विश्रांतीची मागणी केली हाेती. त्यामुळे त्यालाही विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात अाला.  
 
भारतीय संघ 
राेहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), दिनेश कार्तिक, लाेकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दीपक हुडा, वाॅशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकत, माे. सिराज, ऋषभ पंत
 
स्पर्धेचे वेळापत्रक
०६ मार्च- भारत वि. श्रीलंका 
०८ मार्च- भारत वि. बांगलादेश 
१० मार्च- श्रीलंका वि. बांगलादेश 
१२ मार्च- भारत वि. श्रीलंका 
१४ मार्च- भारत वि. बांगलादेश 
१६ मार्च- श्रीलंका वि. बांगलादेश 
१८ मार्चलाफायनल 
(सामने प्रेमदासावर, सायं. ७.०० वाजेपासून)
बातम्या आणखी आहेत...