आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • For Number One In All Three Formats, Team Has To Win 6 Matches In 23 Days

तिन्ही फाॅरमॅटमध्ये नंबर वनसाठी टीमला जिंकावे लागणार 23 दिवसांत 6 सामने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय संघाने गतवर्षी काही महत्त्वाच्या सामन्यांत पराभव पत्करला. याच पराभवामुळे टीमला क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमधील नंबर वनचे सिंहासन गमवावे लागले. मात्र, अाता काेहली अँड कंपनीसाठी क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये  नंबर वनचे स्थान पुन्हा गाठण्याची संधी अाहे. यासाठी टीमला पुढील २३ दिवसांमध्ये सलग ६ सामन्यांमध्ये विजयाची नाेंद करावी लागेल.   


या सहा सामन्यांमध्ये दाेन दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध अाहेत. त्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेतील तिरंगी मालिकेमध्ये चार सामने खेळणार अाहेत. या मालिकेत यजमान श्रीलंकेसह भारत अाणि बांगलादेश टीमचा समावेश अाहे.   


अायसीसीच्या टी-२० टीम क्रमवारीमध्ये अाता पाकिस्तानचा संघ १२६ गुणांसह अव्वल स्थानावर अाहे. त्यापाठाेपाठ अाॅस्ट्रेलिया १२३ गुणांसह दुसऱ्या स्थानी अाहे. भारताचा संघ १२२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम अाहे. अाता अाफ्रिकेविरुद्धचा दुसरा टी-२० सामना उद्या बुधवारी हाेईल. यातील विजयाने भारताला  दुसरे स्थान गाठता येईल. याने भारताचे १२४ गुण हाेतील. 


तिरंगी मालिकेत ६ ते १४ मार्चदरम्यान भारत चार टी-२० लीग सामने खेळणार
येत्या ६ मार्चपासून श्रीलंकेमध्ये तिरंगी मालिकेला सुरुवात हाेत अाहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाला चार सामन्यांत अापले काैशल्य पणास लावावे लागेल. यात भारताचे सामने ६, ८, १२ अाणि १४ मार्च राेजी हाेतील. या चारही सामन्यांतील विजयाने भारताचे एकूण १२६ गुण हाेतील. त्यामुळे भारतीय संघ क्रमवारीत पाकला मागे टाकून नंबर वन हाेऊ शकेल. यात भारताला गुणांच्या सरासरीने हे स्थान गाठता येईल.


क्रिकइन्फो पुरस्कारात कुलदीप यादवची सर्वाेत्कृष्ट डेब्युटेंटसाठी झाली निवड  
गत वर्षी अापल्या धारदार गाेलंदाजीने चर्चेत अालेल्या चायनामॅन गाेलंदाज कुलदीप यादवला क्रिकइन्फाेचा पुरस्कार जाहीर झाला. यासाठी त्याला ‘सर्वाेत्कृष्ठ डेब्युटेंट’ पुरस्कार मिळाला. त्याने गत वर्षी धर्मशालेच्या मैदानावर अापल्या पहिल्या कसाेटी सामन्यात डेव्हिड वाॅर्नरच्या रुपाने अापली पहिली इंटरनॅशनल विकेट घेतली हाेती.  त्याने गत वर्षी २२.१८ च्या सरासरीने सर्वच फाॅरमॅटमध्ये ४३ विकेट घेतल्या अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...