Home | Sports | From The Field | Hina Sidhu, Gagan Narang took gold medal in International Shooting Championship

हिना सिद्धू, गगन नारंगने घेतला सुवर्णवेध; अांतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत यश

वृत्तसंस्था | Update - May 15, 2018, 01:20 AM IST

माजी नंबर वन हिना सिद्धू अाणि अाॅलिम्पियन गगन नारंगने साेमवारी हनाेवर अांतरराष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपद

 • Hina Sidhu, Gagan Narang took gold medal in International Shooting Championship

  हनाेवर (जर्मनी) - माजी नंबर वन हिना सिद्धू अाणि अाॅलिम्पियन गगन नारंगने साेमवारी हनाेवर अांतरराष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्यांनी अापापल्या गटात चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला.

  दुसरीकडे भारताची निवेथा ही महिला नेमबाज कांस्यपदकाची मानकरी ठरली. त्यामुळे भारताला जर्मनी येथे सुरू झालेल्या अांतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्याच दिवशी तीन पदकांची कमाई करता अाली. यात दाेन सुवर्णांसह एका कांस्यपदकाचा समावेश अाहे. अाता युवांच्या कामगिरीने या पदकाच्या संख्येत वाढ हाेण्याची शक्यता अाहे.


  टाॅप्समधून बाहेर; गगनला सुवर्ण : गमावलेली लय अाणि अनफिटमुळे गगन नारंगला गत महिन्यात टारगेट अाॅलिम्पिक पाेडियममधून (टाॅप्स) बाहेर करण्यात अाले. मात्र, त्याने पुन्हा एकदा फाॅर्मात येऊन सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषांच्या एअर पिस्तूल प्रकारामध्ये हे यश संपादन केले. त्याने २४९.६ गुणांसह अव्वल स्थान गाठले. स्वीडनच्या मार्कस मॅडसेनने राैप्य अाणि अमेरिकेचा जाॅर्जने कांस्यपदकाची कमाई केली.

  हिनाने टाकले मटिल्डाला मागे; बराेबरीनंतर अाघाडी
  हिनाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने या गटाच्या फायनलमध्ये फ्रान्सच्या मटिल्डाला मागे टाकले. या दाेघींनी प्रत्येकी २३९.८ गुण संपादन केले. त्यामुळे सामना बराेबरीत राहिला. त्यानंतर हिनाने टाय शाॅटमध्ये सरस कामगिरीच्या बळावर बाजी मारली अाणि सुवर्णपदक अापल्या नावे केले. निवेथा २१९.२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.

Trending