आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायसीसी वर्ल्डकप; चाैथ्यांदा वर्ल्डकप जिंकून इतिहास रचण्यासाठी भारताचे युवा सज्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माउंट- सलगच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय युवा संघ अाता चाैथ्यांदा विश्वचषक जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला अाहे. गत उपविजेत्या भारताचा अायसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना शनिवारी तीन वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन अाॅस्ट्रेलियाशी हाेईल. भारताने अातापर्यंत तीन वेळा विश्वविजेतेपद पटकावले अाहे. अाता चाैथ्यांदा वर्ल्डकप ट्राॅफी जिंकण्याचा भारतीय युवांचा मानस अाहे. मुंबईचा युवा सुपरस्टार पृथ्वी शाॅच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ फायनल खेळणार अाहे. दुसरीकडे अाॅस्ट्रेलियन युवा संघ जेसन संघाच्या नेतृत्वात फायनलमध्ये अापले काैशल्य पणास लावणार अाहे.   


भारताने उपांत्य सामन्यात अापल्या पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला माेठ्या फरकाने पराभूत केले. यासह भारताने वर्ल्डकपचे तिकीट मिळवले. अाता हीच विजयी माेहीम कायम ठेवताना वर्ल्डकप ट्राॅफी अापल्या नावे करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.  


युवा रनमशीनवर सर्वांची नजर

  कणखर अाणि सक्षमपणे भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या युवा फलंदाज पृथ्वी शाॅवर सर्वांची नजर असेल. त्याने सलामीच्या सामन्यापासून या वर्ल्डकपमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे या रनमशीनकडून अाता टीमला माेठ्या खेळीची अाशा अाहे. त्यापाठाेपाठ शुबमान गिलही फाॅर्मात अाहे.     


गाेलंदाजीत पारडे जड

या फायनलमध्ये किताबाच्या इराद्याने मैदानावर उतरणाऱ्या भारतीय संघाचे गाेलंदाजीतही पारडे अधिक जड मानले जाते. शिवम मवी, कमलेश नागरकाेटी, अभिषेक शर्मा, अनुकूल राॅय हे चाैघे फाॅर्मात अाहेत. त्यामुळे टीमच्या विजयाची मदार या युवांवर असेल. 

 

भारताला अातापर्यंत तीन जेतेपदे, दाेन उपविजेतेपदे 
युवांच्या विश्वचषकातील भारतीय संघाची कामगिरी अातापर्यंत सरस ठरलेली अाहे.  भारताने तब्बल पाच वेळा वर्ल्डकपची फायनल गाठली. यादरम्यान भारताने तीन वेळा वर्ल्डकप ट्राॅफी पटकावली. यामध्ये २०००, २००८ अाणि २०१२ च्या वर्ल्डकपचा समावेश अाहे. तसेच दाेन वेळा भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारतीय संघ २००६ अाणि २०१६ मधील विश्वचषकात उपविजेता ठरला.

 

भारत-अाॅस्ट्रेलियन युवा सहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा समाेरासमाेर 
भारत अाणि अाॅस्ट्रेलियन युवा संघ तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये समाेेरासमाेर अाले अाहेत. यापूर्वी या दाेन्ही संघांमध्ये २०१२ मध्ये विश्वचषकाची फायनल झाली हाेती.  या सामन्यात बाजी मारून भारताने विश्वविजेतेपद पटकावले हाेते. भारताने यात अाॅस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात केली हाेती.  हा वर्ल्डकप अाॅस्ट्रेलियात अायाेजित करण्यात अाला हाेता.  अाता याच कामगिरीला उजाळा देण्यासाठी भारताचे युवा उत्सुक अाहेत. 

 

अातापर्यंतची जेतेपदाची कामगिरी

> २००० भारत (माे. कैफचे नेतृत्व) श्रीलंकेवर ६ गड्यांनी मात  

> २००८ भारत (काेहलीचे नेतृत्व) अाफ्रिकेवर १२ धावांनी मात  

> २०१२ भारत (उन्मुक्तचे नेतृत्व) अाॅस्ट्रेलियावर ६ गड्यांनी मात 

 

संभाव्य संघ 
भारत :
पृथ्वी शाॅ (कर्णधार), शुबमान गिल, मनज्याेत कार्ला, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, हार्विक देसाई, शिवम मवी, कमलेश नागरकाेटी, ईशान पाेरल, अनुकूल राॅय, शिवा सिंग, अार्यन जुयाल, अर्शदीप सिंग, पंकज यादव.  
अंाॅस्ट्रेलिया : जेसन सांघा (कर्णधार), विल सॅथरलँड, झेव्हियर, मॅक्स बार्यंट, जॅक एडवर्ड, झॅक इव्हान्स, जेराेड फ्रीमन, रेयान हॅडली, हाेल्ट, नथॅन, जाेनाथन मेर्लाे, पाेपे, पारम उप्पल, अाॅस्ट्रिन वाॅ.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, भारताने १२ वर्षांत ३ वर्ल्डकप जिंकले...

बातम्या आणखी आहेत...