आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिलांचा अाफ्रिकेत सलग दुसरा मालिका विजय; द. अाफ्रिकेवर 54 धावांनी मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केपटाऊन- हरमनप्रीत काैर अाणि मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने दक्षिण अाफ्रिका दाैऱ्यामध्ये एेतिहासिक मालिका विजयाची नाेंद केली. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिलांनी शनिवारी यजमान दक्षिण अाफ्रिकेवर मालिका विजय संपादन केला. भारताने पाचव्या अाणि निर्णायक टी-२०  सामन्यामध्ये अाफ्रिकेवर ५४ धावांनी मात केली. यासह भारतीय महिलांनी पाच टी-२० सामन्यांची मालिका ३-१ ने अापल्या नावे केली. भारताचा हा सलग दुसरा मालिका विजय ठरला. यापूर्वी भारतीय महिला संघाने अाफ्रिकेविरुद्धची तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली हाेती.  मिताली राज मालिकावीर अाणि सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.  


युवा गाेलंदाज शिखा पांडे (३/१६), राजेश्वरी गायकवाड (३/२६) अाणि अनुभवी खेळाडू रुमेली धार (३/२६) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने निर्णायक सामन्यात अाफ्रिकेवर मात केली.   


मिताली राजच्या (६२) झंझावाताच्या बळावर भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करताना अाफ्रिकेसमाेर विजयासाठी १६७ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात अाफ्रिकेला १८ षटकांत ११२ धावांमध्ये अापला गाशा गुंडाळावा लागला.  धावांचा पाठलाग करणाऱ्या अाफ्रिकेची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर ली (३), लुस (५) स्वस्तात बाद झाल्या. त्यापाठाेपाठ कर्णधार वान १० अाणि प्रीझ १७ धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतल्या.

 

> ५४ धावांनी विजयी  
> ३-१ ने जिंकली मालिका  
> ११२ धावांत अाफ्रिकेचा खुर्दा  
> ०३ विकेट प्रत्येकी शिखा, राजेश्वरी व रुमेलीच्या  
> ६२ धावांचे मितालीचे याेगदान  
> ९८ धावांची मिताली-जेमिमाची भागीदारी

 

मुंबईच्या जेमिमाची  मिताली राजसाेबत अर्धशतकी भागीदारी

भारताकडून मिताली राजला मुंबईच्या युवा फलंदाज  जेमिमा राॅड्रिग्जची माेलाची साथ मिळाली. या दाेघांनी दुसऱ्या गड्यासाठी ९८ धावांची भागीदारी रचली. यामध्ये जेमिमाने ४४ धावांचे याेगदान दिले. तिने ३४ चेंडूंत ३ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ही खेळी केली. तिला खाकाने बाद केले.

 

मितालीचे मालिकेत तिसरे अर्धशतक
मिताली राजने  झंझावाती अर्धशतक झळकावले. तिने तुफानी फटकेबाजी करताना ५० चेंडूंमध्ये ६२ धावांची खेळी केली. यामध्ये ८ चाैकारांसह ३  षटकारांचा समावेश अाहे.  तिचे मालिकेतील हे तिसरे अर्धशतक ठरले. तिने  पहिल्या व दुसऱ्या सामन्यांत अनुक्रमे नाबाद ५४, ७६ धावा काढल्या.

 

शिखा, राजेश्वरी, रुमेलीकडून दाणादाण 
भारताच्या युवा गाेलंदाज शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड अाणि रुमेलीने भेदक मारा करताना यजमान अाफ्रिकन महिलांची दाणादाण उडवली. त्यामुळे टीमच्या अाघाडीच्या खेळाडूंना फार काळ  अापले अाव्हान कायम ठेवता अाले नाही. भरताच्या या तिन्ही गाेलंदाजांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

बातम्या आणखी आहेत...