आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताविरुद्ध सलग दाेन वनडे जिंकण्यात श्रीलंका अपयशी; अाज दुसरा सामना माेहालीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माेहाली- सलामीच्या पराभवातून सावरलेला यजमान भारतीय संघ अाता बुधवारी श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत विजयी ट्रॅकवर येण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी युवा कर्णधार राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या खेळाडूंनी कंबर कसली. भारत अाणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना बुधवारी माेहालीच्या मैदानावर हाेणार अाहे. भारतासाठी हा निर्णायक सामना अाहे. पाहुण्या श्रीलंकेने विजयी सलामी देऊन तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता दुसऱ्या वनडेत विजयश्री खेचून मालिका अापल्या नावे करण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न असेल. मात्र, अातापर्यंतच्या इतिहासात श्रीलंकन टीमला  भारताविरुद्ध सलग दाेन सामने जिंकता अाले नाहीत. त्यामुळे ही अपयशाची परंपरा खंडित करण्यासाठी अाता श्रीलंकन टीमला माेठी कसरत करावी लागेल. कारण, भारतीय संघ सलामीच्या पराभवातून सावरला अाहे. अाता मालिकेत दमदार कमबॅक करण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. राेहित शर्मा अाता कणखर नेतृत्वात टीमला विजयी ट्रॅकवर अाणण्यासाठी सज्ज झाला अाहे.


३५ वर्षांत ४१ मालिका 
वनडे क्रिकेटच्या  इतिहासात अातापर्यंत भारत अाणि श्रीलंकन टीम मागील ३५ वर्षांपासून खेळत अाहेत. या तीन दशकांच्या कालावधीमध्ये या दाेन्ही संघांत अातापर्यंत ४१ मालिका झाल्या अाहेत. यामध्ये भारताने २५ मालिका अापल्या नावे केल्या. केवळ पाच मालिका श्रीलंकेला जिंकता अाल्या.  उर्वरित मालिका बराेबरीत राहिल्या. 

 

सलग विजयाची प्रतीक्षा 
 पाहुण्या श्रीलंका टीमला अाता भारतविरुद्ध सलग दुसऱ्या विजयाची अाशा अाहे. यासाठी या टीमचे खेळाडू प्रतीक्षेत अाहे. कारण, २०१० पासून या टीमला भारताला सलग दाेन वनडेत पराभूत करता अाले नाही. यादरम्यान भारताने शेवटचे दाेन सामने जिंकले हाेते. मात्र, त्यानंतर श्रीलंका टीम सातत्याने अपयशी ठरत अाहे.  त्यामुळे ही मालिका खंडित करण्यासाठी श्रीलंकेचे युवा उत्सुक अाहेत.

 

 

माेहाली अाहे यजमानांना लकी 
पंजाबमधील माेहालीत अातापर्यंत सर्वाधिक २३ वनडे सामने खेळले अाहे. यातील १९ वनडे सामने भारतानेच खेळले अाहेत. लकी असलेल्या याच मैदानावर भारताला १४ वनडेत विजयश्री मिळवता अाला. त्यामुळे या मैदानावरील अापली विजयी लय कायम ठेवण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. दुसरीकडे श्रीलंकेने या मैदानावर तीन सामने खेळले. यातील दाेन सामन्यात पाहुणी श्रीलंकन टीम विजयी झाली हाेती. 


धाेनीचा ३११ वा वनडे; गांगुलीशी साधणार बराेबरी 
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धाेनी अाता बुधवारी माेहालीच्या मैदानावर उतरताच दादा साैरव गांगुलीच्या कामगिरीशी बराेबरी साधेल. धाेनीचा अापल्या करियरमधील हा ३११ वा वनडे सामना अाहे. यासह ताे गांगुलीच्या ३११ वनडे खेळण्याच्या कामगिरीशी बराेबरी साधणार अाहे. भारताकडून सर्वाधिक ४६३ वनडे खेळण्याची नाेेंद सचिनच्या नावे अाहे. द्रविड ३४४ वनडेसह दुसऱ्या स्थानावर अाहे. 

 

संभाव्य संघ : भारत : राेहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंजिक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंग धाेनी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ काैल.

 

श्रीलंका : तिसारा परेरा (कर्णधार), थरंगा, गुणतालिका, थिरीमाने, अॅग्लाे मॅथ्यूज, गुणारत्ने, डिकवेला, चांतुरंगा डिसिल्वा, अकिला धनंजया, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, समरविक्रमा, धनंजय डिसिल्वा, चामिरा, पाथिराना, कुशल परेरा.

बातम्या आणखी आहेत...