आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अजिंक्य’ खेळीने 26 वर्षांनंतर विजयाची विराट संकल्पपूर्ती; डर्बनच्या मैदानावर भारताचा विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डर्बन- कर्णधार विराट काेहली (११२) अाणि अजिंक्य रहाणे (७९) यांच्या १८९ धावांच्या भागीदारीच्या बळावर टीम इंंडियाने गुुरुवारी तब्बल २६ वर्षांनंतर डर्बनच्या मैदानावर यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध विजयाच्या संकल्पाची पूर्ती केली. भारताने सलामीच्या वनडेत अाफ्रिकेवर ६ गड्यांनी मात केली. यासह भारताने सहा वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने अाघाडी घेतली. पाहुण्या भारतीय संघाचा या मैदानावरचा हा पहिलाच विजय ठरला. भारताचा या मैदानावरील हा अाठवा वनडे हाेता. अाता मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी सेंच्युरियन येथील  मैदानावर रंगणार अाहे. 


कुलदीप यादव (३/२४) अाणि यजुवेंद्र चहलच्या (२/४५) धारदार गाेलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या अाफ्रिकेने ६ बाद २६९ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात भारताने ४५.३ षटकांत ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. भारताकडून विराट काेहली अाणि अजिंक्य रहाणेने  झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताला मालिकेमध्ये शानदार विजयी सलामी देता अाली. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाकडून सलामीवीर राेहित शर्मा (२०) अाणि शिखर धवनने (३५) चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या गड्यासाठी ३३ धावांची भागीदारी रचली. दरम्यान माेर्कलने सलामीच्या राेहितला बाद करून ही जाेडी फाेहली. त्यानंतर धवन हा धावबाद हाेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. 


काेहलीचा झंझावात 
फाॅर्मात अालेल्या काेहलीने सलामीच्या वनडेत झंझावाती खेळी केली. त्याने यजमानांच्या गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेताना शतक झळकावले. त्याने ११९ चेंडूंचा सामना करताना ११२ धावा काढल्या. त्याचे हे करिअरमधील ३३ वे वनडे शतक ठरले. 


नाणेफेक जिंकून यजमान दक्षिण अाफ्रिका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डिकाॅक (३४) अाणि हाशिम अामला (१६) यांनी दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, भारताच्या बुमराहने ही जाेडी फाेडली. त्याने अनुभवी फलंदाज अामलाला पायचीत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अामलाने १७ चेंडूंचा सामना करताना एका चाैकारासह १६ धावांचे याेगदान दिले. कर्णधार डुप्लेसिनने डाव सावरताना  क्विंटनसाेबत अर्धशतकी भागीदारी रचली. या दाेघांनी दुसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी केली.

 

अजिंक्य रहाणेचे अर्धशतक 
अजिंक्य रहाणेने शानदार अर्धशतकाचे याेगदान दिले. त्याने ८६ चेंडूंचा सामना करताना ७९ धावांची खेळी केली. यात ५ चाैकार अाणि दाेन उत्तंुग षटकारांचा समावेश अाहे. त्याचे हे करिअरमधील २४ वे अर्धशतक ठरले.

 

कुलदीपच्या तीन विकेट
कुलदीप यादवने सलामीच्या वनडे सामन्यात धारदार गाेलंदाजी केली. त्याने १० षटकांत ३४ धावा देताना तीन गड्यांना तंबूत पाठवले. त्याने ड्युमिनी (१२), मिलर (३७) अाणि माेरिसला (२७) बाद केले.  यजुवेंद्र चहल सामन्यात चमकला. त्याने दाेन विकेट घेतल्या. 

 

डुप्लेसिसचे शतक व्यर्थ
टीमच्या धावसंख्येला गती देण्यासाठी अाफ्रिकन कर्णधार डुप्लेसिसने झंझावाती शतक ठाेकले. त्याने एकाकी झुंज देत ११२ चेंडूंमध्ये १२० धावा काढल्या. यात ११ चाैकार अाणि दाेन उत्तुंग षटकारांचा समावेश अाहे. याच शतकामुळे अाफ्रिकेच्या धावसंख्येचा अालेख उंचावला.

बातम्या आणखी आहेत...