Home | Sports | From The Field | India VS Afghanistan test match india win the match

अफगाणचे 9 फलंदाज 7 तासांत दाेन वेळा बाद; टीम इंडियाचा 87 वर्षांनंतर माेठा विजय

वृत्तसंस्था | Update - Jun 16, 2018, 05:58 AM IST

नंबर वन टीम इंडियाने दाेन दिवसांत घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्धची कसाेटी जिंंकून अापले वर्चस्व सिद्ध केले. युवा कर्

 • India VS Afghanistan test match india win the match

  बंगळुरू - नंबर वन टीम इंडियाने दाेन दिवसांत घरच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्धची कसाेटी जिंंकून अापले वर्चस्व सिद्ध केले. युवा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात यजमान भारताने ८७ व्या वर्षात सर्वात माेठ्या विजयाची नाेंद केली. भारताने शुक्रवारी एकमेव कसाेटीत अफगाणिस्तानवर डाव अाणि २६२ धावांनी मात केली.

  यासह भारताने माेठा विजय अापल्या नावे केला. या विजयात अार. अश्विन (४/२७) अाणि रवींद्र जडेजा (४/१७) यांनी माेलाचे याेगदान दिले. यांनी धारदार गाेलंदाजी करताना एकाच दिवशी अफगाणिस्तान संघाचा सलग डावात धुव्वा उडवला. यात अफगाणिस्तानचा पहिल्या डावात १०९ अाणि दुसऱ्या डावात १०३ धावांत खुर्दा उडाला. त्यामुळे पाहुण्या अफगाणिस्तान संघाचे ९ फलंदाज अवघ्या सात तासांमध्ये दाेन वेळा बाद झाले.

  पहिल्या डावात या टीमचा वफादार हा गोलंदाज नाबाद राहिला अाणि दुसऱ्या डावात हशमतुल्लाह शाहिद हा नाबाद राहिला. भारताने पहिल्या डावात ४७४ धावा काढल्या. त्यामुळे पदार्पणातच अफगाणिस्तान संघाला फाॅलाेअाॅनच्या नामुष्कीसह माेठ्या फरकाने लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. शानदार शतकी खेळी करून विक्रम रचणारा यजमान भारताचा सलामीवीर शिखर धवन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

  ११६ वर्षांत प्रथमच एकाच दिवशी २४ बळी
  भारत अाणि अफगाणिस्तान एकमेव कसाेटीचा दुसरा दिवस गाेलंदाजांनी गाजवला. त्यामुळे दिवसभरात एकूण २४ विकेट पडल्या. यात भारताच्या ४ अाणि अफगाणिस्तानच्या २० बळींचा समावेश अाहे. जडेजाने एकूण ६ अाणि अश्विनने ५ विकेट घेतल्या. यापूर्वी १९०२ मध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत २५ विकेट पडल्या होत्या.

  पुढील स्लाईडवर पहा,सामन्याचे धावफलक .....

 • India VS Afghanistan test match india win the match
 • India VS Afghanistan test match india win the match

Trending