Home | Sports | From The Field | Indian women second win; beats Thailand by 66 runs

भारतीय महिलांचा दुसरा विजय; थायलंड टीमवर 66 धावांनी मात

वृत्तसंस्था | Update - Jun 05, 2018, 04:46 AM IST

कर्णधार हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी साेमवारी अाशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची न

 • Indian women second win; beats Thailand by 66 runs

  क्वालालंपूर - कर्णधार हरमनप्रीत काैरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांनी साेमवारी अाशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. सहा वेळच्या चॅम्पियन भारतीय महिला संघाने स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात थायलंडचा पराभव केला. भारताने ६६ धावांनी सामना जिंकला. भारताने या विजयाच्या बळावर गुणतालिकेत चार गुणांसह अव्वल स्थान गाठले. यासह भारताने स्पर्धेत अापला दबदबा निर्माण केला. अष्टपैलू कामगिरी करणारी कर्णधार हरमनप्रीत काैर ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

  हरमनप्रीत (नाबाद २७), अनुजा पाटील (२२), माेना मेश्राम (३२) अशनी स्मृती मंधानाच्या (२९) शानदार फलंदाजीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करताना थायलंडसमाेर विजयासाठी १३३ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात थायलंड महिलांनी ८ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या ६६ धावांपर्यंत मजल मारली. थायलंडकडून बुचथामने सर्वाधिक २१ धावांची खेळी केली. तसेच चैवाईने १४ धावांचे याेगदान दिले. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही.

  हरमनप्रीतची अष्टपैलू कामगिरी : भारताची कर्णधार हरमनप्रीत काैरने सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. तिने फलंदाजी व गाेलंदाजीमध्ये सरस खेळी करताना संघाचा विजय निश्चित केला. तिने फलंदाजीत नाबाद २७ धावांचे याेगदान दिले. गाेलंदाजीमध्ये ३ षटकांत ११ धावा देत ३ गडी बाद केले.

  बांगलादेशची पाकवर मात
  बांगलादेश महिलांनी पाकवर ७ गड्यांनी मात केली. यासह बांगलादेशने विजयाचे खाते उघडले. पाकने ५ बाद ९५ धावा काढल्या हाेत्या. बांगलादेशने १७.५ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.

  उद्या हॅट्ट्रिकची संधी
  फाॅर्मात असलेल्या भारतीय महिलांना अाता स्पर्धेत विजयाची हॅट््ट्रिक नाेंदवण्याची संधी अाहे. भारताचा स्पर्धेतील तिसरा सामना उद्या बुधवारी बांगलादेशविरुद्ध हाेणार अाहे. सलगच्या विजयाने भारताच्या महिलांनी अापला दबदबा निर्माण केला. अाता हीच लय कायम ठेवत तिसरा सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

Trending