आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिका भारतीय महिलांकडे; द.अाफ्रिकेने केला शेवट गाेड,भारतीय महिलांनी 2-0 ने जिंकली मालिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाेटचेफस्ट्रुम- मिताली राजच्या नेतृृत्वाखाली भारतीय महिला संघाने दाैऱ्यात यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्धची तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली.  रविवारी यजमान दक्षिण अाफ्रिकेने मालिकेतील शेवटच्या अाणि तिसऱ्या वनडे सामन्यात भारतावर  मात केली. अाफ्रिकेने राेमांचक लढतीत ७ गड्यांनी विजयाची नाेंद केली. यासह अाफ्रिकेला मालिकेतील अापला शेवट गाेड करता अाला. याशिवाय अाफ्रिकन महिला टीमला अापली पराभवाची मालिका खंडित करता अाली.  

 
वेदा कृष्णमूर्ती (५६)  अाणि दीप्ती शर्मा (७९) यांच्या झंझावाती अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करताना अाफ्रिकेसमाेर विजयासाठी २४१ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात अाफ्रिकेने चार चेंडू शिल्लक असताना ३ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. प्रिझ (नाबाद ९०) अाणि वान (नाबाद ४१) यांच्या अभेद्य अर्धशतकी भागीदारीच्या बळावर अाफ्रिकेला विजयाची नाेंद करता अाली.  त्यांनी संघाच्या विजयासाठी भारताच्या सुमार गाेलंदाजीचा खरपुस समाचार घेतला. यातून टीमच्या धावसंख्येला गती मिळाली. 


अाफ्रिकन महिलांचा मालिकेतील हा पहिला विजय ठरला. मात्र, टीमला  अापला मालिका पराभव टाळता अाला नाही. सलगच्या दाेन पराभवानंतर अाफ्रिका टीमला टीम मालिकेत विजयी ट्रॅकवर परतली. त्यामुळे टीमला शेवटही गाेड करता अाला.    


वेदा, दीप्तीची खेळी व्यर्थ 
भारताकडून वेदा कृष्णमूर्ती (५६) व दीप्ती शर्माने (७९) तुफानी खेळी करताना अर्धशतके ठाेकली. मात्र, टीमला अापल्या विजयाची लय कायम ठेवता अाली नाही. दीप्तीने ११२ चेंडूंचा सामना करताना ८ चाैकारांच्या अाधारे ७९ धावांची खेळी केली. तसेच वेदाने ६४ चेंडूंत ५६ धावा काढल्या.

 

प्रिझ, वानने विजयश्री खेचली 
दक्षिण अाफ्रिकन टीमच्या विजयात युवा प्रिझ अाणि वानचे माेेलाचे याेगदान ठरले. त्यांनी एकाकी झंुज देताना राेमांचक लढतीत विजयश्री यशस्वीपणे खेचून अाणली. प्रिझने १११ चेंडूंचा सामना करताना ७ चाैकारांच्या अाधारे नाबाद ९९ धावा काढल्या. तसेच वानने ३० चेंडूंत पाच चाैकारांसह नाबाद ४१ धावांची खेळी केली.   

बातम्या आणखी आहेत...