आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या दाेन्ही संघांना अाफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंच्युरियन- भारताचे पुरुष अाणि महिला क्रिकेट संघ  सलगच्या विजयाची लय कायम ठेवत यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाले अाहेत. फाॅर्मात असलेल्या भारताच्या या दाेन्ही संघाला मालिका विजयाची संधी अाहे. यातून भारताच्या संघांना दाैऱ्यामध्ये यजमान अाफ्रिकेविरुद्ध वनडेपाठाेपाठ टी-२० मालिकाही जिंकण्याचा पराक्रम गाजवता येईल.  


विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बुधवारी सेंच्युरियनच्या मैदानावर दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळणार अाहे. सलामीचा सामना जिंकून भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने अाघाडी घेतली. अाता दुसऱ्या सामना जिंकल्यास भारतीय संघाला मालिकेत विजयी अाघाडी घेता येईल.  दुसरीकडे भारताचा महिला संघ अाता अाफ्रिकेविरुद्ध मालिकेतील चाैथा टी-२० सामना खेळणार अाहे. भारताने सलग दाेन विजयासह पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-१ ने अाघाडी घेतली अाहे.


काेहली गाठणार दाेन हजारांचा पल्ला
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अाता क्रिकेटच्या छाेट्या फाॅरमॅट टी-२० मध्ये २ हजार धावांंचा पल्ला गाठणार अाहे. यासाठी त्याला अवघ्या १८ धावांची गरज अाहे. यासह ताे यामध्ये दाेन हजार धावा पूर्ण करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरेल. त्याने अातापर्यंत करिअरमधील ५६ टी-२० सामन्यात १९८२ धावा काढल्या अाहेत. दाेनहजारी हाेणारा काेहली हा जगातील तिसरा फलंदाज ठरेल. यापूर्वी मार्टिन गुप्तिल (२२५०) अाणि मॅक्लुमने (२१४०) हा पल्ला गाठला अाहे.   


भुवन, चहलची नजर दुसऱ्या विजयाकडे
गत सामन्यात धारदार गाेलंदाजी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारची नजर अाता दुसऱ्या विजयाकडे लागली अाहे. त्याने सलामीला पाच विकेट घेऊन अाफ्रिकेचा १७५ धावांमध्ये खुर्दा उडवला हाेता. त्यामुळे अाता हीच लय कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे यजुवेंद्र चहलही चांगली कामगिरी करत अाहे. त्याचा फायदा निश्चित टीमला इंडियाला मालिका विजयासाठी हाेऊ शकताे.   


हरमनप्रीतच्या नेतृृत्वात यश 
युवा कर्णधार हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली अाफ्रिकेविरुद्ध मालिका विजयाचे एेतिहासिक यश संपादन करण्यासाठी भारतीय महिला संघ उत्सुक अाहे. यातील विजयाने भारताला विजयी अाघाडी घेता येईल. संघाला हे यश मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राची युवा फलंदाज स्मृती मंधना, गाेलंदाज अनुजा पाटील, पूनम यादव सज्ज झाल्या अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...