आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासेंच्युरियन- कर्णधार काेहलीने अापल्या विराट नेतृत्वाच्या बळावर टीम इंडियाला दाैऱ्यामध्ये २६ वर्षांतील विजयाची अवघ्या १६ दिवसांमध्ये बराेबरी साधून दिली. भारताने शुक्रवारी मालिकेतील सहाव्या अाणि शेवटच्या वनडे सामन्यात यजमान दक्षिण अाफ्रिकेवर ८ गड्यांनी मात केली. यासह भारताने सहा वनडे सामन्यांची मालिका ५-१ ने अापल्या नावे केली. भारताने अातापर्यंत २६ वर्षांत अाफ्रिकेविरुद्ध पाच विजयांची नाेंद केली. यासाठी भारताला २६ वर्षे लागली. मात्र, हेच विजयाचे यश काेहलीने अापल्या कणखर नेतृत्वाखाली भारताला अवघ्या १६ दिवसांमध्ये मिळवून दिले.
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण अाफ्रिकेने ९ बाद २०४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात भारताने २ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. सलामीवीर राेहित शर्मा १५ धावांचे याेगदान देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, त्याने कर्णधार काेहलीसाेबत दुसऱ्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी रचली. यासह त्याने शानदार खेळी करताना टीम इंडियाच्या विजयाचा मजबूत पाया रचला.
काेहलीच्या ५५८ धावा
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने दाैऱ्यात अाफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका गाजवली. त्याने या सहा वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये एकूण ५५८ धावा काढल्या. यामध्ये तीन शतकांसह एका अर्धशतकाचा समावेश अाहे. तसेच यादरम्यान त्याने नाबाद ४६ अाणि ३६ धावांचीही खेळी केली अाहे. त्यामुळे त्याला यजमान दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच मैदानावरील मालिकेत सर्वाधिक ५५८ धावांचा विक्रम रचता अाला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे दमदार सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या अाफ्रिकन टीमची निराशा झाली. सलामीवीर हाशिम अामला १० धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला शार्दूलने बाद केले. त्यापाठाेपाठ मार्करामही (२४) बाद झाला. त्यामुळे टीमला चांगली सुरुवात करता अाली नाही. मार्करामने ३० चेंडूंमध्ये २४ धावांची खेळी केली.
झांडाेची एकाकी झुंज
अाफ्रिकेची पडझड थांबवण्यासाठी झांडाेने एकाकी झंुज दिली. त्याने ७४ चेंडूंचा सामना करताना ३ चाैकार अाणि २ षटकारांच्या अाधारे ५४ धावांची खेळी केली. यामुळे त्याने टीमच्या धावसंख्येला गती दिली. क्लासेनने २२ अाणि डिव्हिलियर्सने ३० धावांचे याेगदान दिले.
विराट काेहलीचे ३५ वे शतक
तुफानी फटकेबाजीने फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीने शुक्रवारी अापल्या करिअरमधील ३५ वे शतक साजरे केले. त्याने २०८ वनडे हा विक्रमी पल्ला गाठला. त्याने ९६ चेंडूंत १९ चाैकार व दाेन षटकारांसह नाबाद १२९ धावांची खेळी केली. त्याच मालिकेतील हे तिसरे शतक ठरलेे.
अाफ्रिकेविरुद्ध एकूण १० विजय
भारताने अाता अाफ्रिकेविरुद्ध एकूण १० वनडेमध्ये विजय संपादन केले अाहेत. यजमान टीमला त्यांच्या मैदानावर सर्वाधिक १० वेळा पराभूत करण्याचा पराक्रम यापूर्वी पाकिस्तानच्या नावे हाेता. अाता याच कामगिरीमध्ये भारताने पाकची बराेबरी साधली. भारताचे अाता अाफिकेविरुद्ध दहा विजय झाले अाहेत.
शार्दूलने विश्वास सार्थकी लावला
सहाव्या वनडेसाठी भुवनेश्वरकुमारला विश्रांती देत शार्दूल ठाकूरला संधी देण्याचा निर्णय घेण्यात अाला. मुंबईच्या या युवा गाेलंदाजाने हा विश्वास सार्थकी लावताना सामन्यात चार विकेट घेतल्या. त्याने ८.५ षटकांत ५२ धावा देताना चार गडी बाद केले. याशिवाय जसप्रीत बुमराह अाणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तसेच हार्दिक व कुलदीपने प्रत्येकी एक बळी घेतला.
पुढील स्लाइडवर पाहा, धावफलक आणि फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.