आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेन स्टोक्सवर 12.5 कोटींची बोली, टी-20 तील यशस्वी फलंदाज गेल, गोलंदाज मलिंगा वाऱ्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता- आयपीएल लिलावात इंग्लंडचा बेन स्टोक्स हा सलग दुसऱ्या वर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरला. १२.५ कोटी रुपयांची बोली लावून राजस्थान रॉयल्सने त्याला खरेदी केले. भारताकडून सर्वात महागडे मनीष पांडे, लोकेश राहुल यांच्यावर ११ कोटींची बोली लावण्यात आली.


फॉर्म गमावलेल्या खेळाडूंमध्ये विविध संघांनी रस दाखवला नाही. त्यामुळेच ट्वेंटी-२० मध्ये ३२३ सामने खेळून ११०६८ धावा करणाऱ्या ख्रिस गेल आणि २४८ सामने खेळून ३३१ बळी घेणाऱ्या गोलंदाज लसिथ मलिंगावर बोली लावण्यात आली नाही. फॉर्ममध्ये असलेले आणि पुढील काही काळ संघाला सांभाळू शकतील अशांना खरेदी करण्याकडे अधिक कल आहे. प्रमुख १० खेळाडूंचे सरासरी वय २६ वर्षे आहे.  यातील केवळ केदार जाधव या एकमेव खेळाडूने वयाची तिशी ओलांडली. दरम्यान, वयाची तिशी ओलांडलेल्या, परंतु फॉर्म चांगला असलेल्यांवरच  बोली लावण्यात आली. यात ब्रँडन मॅक्युलम, शेन वॉटसनसारख्या खेळाडूंची नावे आहेत. महेंद्रसिंग धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने अनुभवावर भर दिला.

 

लिलावात ११० खेळाडूंची नावे, ७८ जणांची विक्री
- लिलावात पहिल्या दिवशी एकूण ११० खेळाडूंची नावे. यात ७८ जणांची विक्री.
- रविवारी १७२ खेळाडूंवर बोली लागणार आहे. संघांकडे आता १२२ कोटी रुपये उरले आहेत.
- १९ वर्षांखालील संघातील शुभमन गिल, पृथ्वी शॉ, कमलेश नागरकोटीवर बोली. पृथ्वीला दिल्ली संघाने घेतले. 

 

 29 विदेशींसह 78 खेळाडूंवर बाेली

अागामी इंडियन प्रीमियर लीगच्या ११ व्या सत्रासाठी शनिवारपासून लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. दरम्यान, पहिल्याच दिवशी युवा चेहऱ्यांनी बाजी मारली. त्यामुळे िदग्गजांकडे फ्रँचायझींनी पूर्णपणे पाठ फिरवली. 


इंग्लंडचा सुपरस्टार अाॅलराउंडर बेन स्टाेक्स हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्यावर १२ काेटींची बाेली लागली. ताे सलग दुसऱ्या वर्षी सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला राजस्थान संघाने १२.५ काेटींमध्ये खरेदी केले. त्यापाठाेपाठ टीम इंडियाचा युवा सलामीवीर लाेकेश राहुल अाणि मनीष पांडेवर प्रत्येकी ११ काेटींची बाेली लागली. हैदराबादच्या टीमने मनीषवर  अाणि पंजाबने राहुलवर बाेली लावली. पहिल्या दिवशी ११० खेळाडूंवर बाेली लावण्यात अाली. यामध्ये २९ विदेशीसह ७८ भारतीय खेळाडूंचा समावेश अाहे. या लिलाव प्रक्रियेमध्ये ३६० खेळाडू सहभागी झाले अाहेत. 


अाता उर्वरित खेळाडूंवर रविवारी बाेली लागणार अाहे. या वेळी स्फाेटक फलंदाज ख्रिस गेलवर सर्वांची नजर असेल. कारण, त्याच्यावर पहिल्या दिवशी काेणत्याही टीमने बाेली लावली नाही. त्याच्यासह ३२ खेळाडूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले अाहेत. यात श्रीलंकेचा मलिंगाही सहभागी अाहे. येत्या मे महिन्यात अायपीएलच्या सत्राला सुरुवात हाेणार अाहे. 

 

१६ जणांसाठी अारटीएम 
पहिल्या दिवशीच्या लिलाव प्रक्रियेमध्ये १६ खेळाडूंसाठी राइट टू मॅच (अारटीएम) कार्डचा वापर करण्यात अाला. यामुळे अनेक युवांना संधी मिळाली.  यामध्ये मुंबईने क्रुणाल पांड्यासाठी हे कार्ड वापरले. 


३२१.१० काेटी खर्च 
अायपीएलच्या ११ व्या सत्रातील अायाेजित लिलाव प्रकियेचा शनिवारी पहिला दिवस पार पडला. यादरम्यान अाठही फ्रँचायझींनी िदवसभरात ३२१.१० काेटींचा खर्च केला. यातून ११० खेळाडूंवर बाेली लावण्यात अाली.

 

पृथ्वीही चमकला

अायसीसीच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या पृथ्वी शाॅचाही या लिलाव प्रक्रियेत चांगलाच दबदबा राहिला. त्याच्यावर १.२ काेटींची बाेली लागली. त्याला दिल्ली टीमने खरेदी केले. त्याची मूळ किंमत केवळ २० लाख रुपये हाेती. मात्र, गत सत्रातील चमकदार कामगिरीच्या बळावर त्याने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच सध्या ताे वर्ल्डकपमध्येही चमकदार कामगिरी करत अाहे. यातूनच त्याला चांगलीच किंमत मिळाली अाहे. त्यामुळे अाता हा युवा फलंदाज अायपीएलमध्येही झंझावाती खेळी करताना दिसणार अाहे. त्याच्यावरच सर्वांची खास नजर असेल. तसेच शुभम गिलला काेलकाता टीमने १.८० काेटी रुपयांमध्ये खरेदी केले अाहे. ताे सध्या वर्ल्डकपमध्ये खेळत अाहे.

 

(हेही वाचा - कोणावर किती लागली बोली )


एवढ्यात झाली प्लेयर्सची विक्री 

फलंदाज रोल बेस प्राइस विक्री खरेदी करणारा संघ 
शिखर धवन (भारत) बॅट्समन 2 कोटी 5.2 कोटी सनरायझर्स हैदराबाद (RTM)
आर. अश्विन (भारत) बॉलर 2 कोटी 7.6 कोटी किंग्स इलेव्हन पंजाब
कीरन पोलार्ड (विंडीज) ऑलराउंडर 2 कोटी 5.4 कोटी मुंबई इंडियन्स (RTM)
ख्रिस गेल (विंडीज) बैट्समैन 2 कोटी अनसोल्ड अनसोल्ड
बेन स्टोक्स (इंग्लंड) ऑलराउंडर 2 कोटी 12.50 कोटी राजस्थान रॉयल्स
फाफ डुप्लेसी (साऊथ अाफ्रिका) बैट्समैन 1.5 कोटी 1.6 कोटी चेन्नई सुपर किंग्स (RTM)
अजिंक्य राहाणे (भारत) बैट्समैन 2 कोटी 4 कोटी राजस्थान रॉयल्स (RTM)
मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) बॉलर 2 कोटी 9.4 कोटी कोलकाता नाइट राइडर्स

 

 

हरभजन सिंग (भारत) बॉलर 2 कोटी 2 कोटी चेन्नई सुपर किंग्स
शाकिब अल हसन (बांग्लादेश) ऑलराउंडर 1 कोटी 2 कोटी सनरायझर्स हैदराबाद
ग्लेन मैक्सवेल (ऑस्ट्रेलिया) बॅट्समन 2 कोटी 9 कोटी दिल्ली डेअरडेव्हील्स
गौतम गंभीर (भारत) बॅट्समन 2 कोटी 2.8 कोटी दिल्ली डेअरडेव्हील्स
ड्वेन ब्रावो (विंडीज) ऑलराउंडर 2 कोटी 6.4 कोटी (RTM) चेन्नई सुपरकिंग्स
केन विलियम्सन (न्यूजीलैंड) बॅट्समन 1.5 कोटी 3 कोटी सनरायझर्स हैदराबाद
जो रूट (इंग्लैंड) बॅट्समन 1.5 कोटी अनसोल्ड अनसोल्ड
युवराज सिंह (भारत) बॅट्समन 2 कोटी 2 कोटी किंग्स इलेव्हन पंजाब
करुण नायर (भारत) बॅट्समन 50 लाख  5.6 कोटी किंग्स इलेव्हन पंजाब
लोकेश राहुल (भारत) बॅट्समन 2 कोटी 11 कोटी किंग्स इलेव्हन पंजाब
मुरली विजय (भारत) बॅट्समन 2 कोटी अनसोल्ड अनसोल्ड
डेविड मिलर (साउथ अफ्रीका) बॅट्समन 1.5 कोटी 3 कोटी (RTM) किंग्स इलेव्हन पंजाब
एरोन फिंच (ऑस्ट्रेलिया) बॅट्समन 1.5 कोटी 6.2 कोटी किंग्स इलेव्हन पंजाब
ब्रेंडन मैक्कुलम (ऑस्ट्रेलिया) बॅट्समन 2 कोटी 3.6 कोटी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
जेसन रॉय (इंग्लैंड) बॅट्समन 1.5 कोटी 1.5 कोटी दिल्ली डेअरडेव्हील्स
क्रिस लिन (ऑस्ट्रेलिया) बॅट्समन 2 कोटी 9.6 कोटी कोलकाता नाइटराइडर्स
हाशिम अमला (साउथ अफ्रीका) बॅट्समन 1.5 कोटी अनसोल्ड अनसोल्ड
मनीष पांडे (भारत) बॅट्समन 1 कोटी 11 कोटी सनरायझर्स हैदराबाद
मार्टिन गुप्टिल (न्यूजीलैंड) बॅट्समन 75 लाख  अनसोल्ड अनसोल्ड
क्रिस वोक्स (इंग्लैंड) बॅट्समन 2 कोटी 7.4 कोटी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
कार्लोस ब्रेथवेट (विंडीज) बॅट्समन 1 कोटी 2 कोटी सनरायझर्स हैदराबाद
शेन वॉटसन (चेन्नई सुपरकिंग्स) ऑलराउंडर 1 कोटी 4 कोटी चेन्नई सुपरकिंग्स
केदार जाधव (भारत) ऑलराउंडर 2 कोटी 7.8 कोटी चेन्नई सुपरकिंग्स
कॉलिन डीग्रैंडहोम (न्यूजीलैंड) ऑलराउंडर 75 लाख रु 2.2 कोटी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
जेम्स फॉक्नर (ऑस्ट्रेलिया) ऑलराउंडर 2 कोटी अनसोल्ड अनसोल्ड
युसूफ पठान (भारत) ऑलराउंडर 75 लाख  1.9 कोटी सनरायझर्स हैदराबाद

 

या प्लेयर्ससाठी झाला RTM चा वापर 

- शिखर धवन - सनरायझर्स हैदराबाद (5.2 )
- केरन पोलार्ड - मुंबई इंडियन्स (5.4 कोटी)


18 प्लेयर्स झाले आहेत रिटेन 
- एमएस धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा (चेन्नई सुपरकिंग्स), ऋषभ पंत, क्रिस मॉरिस, श्रेयस अय्यर (दिल्ली डेअरडेविल्स), रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रित बुमराह (मुंबई इंडियन्स), विराट कोहली, एबी डिव्हीलियर्स, सरफराज खान (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु), सुनील नरेन, आंद्रे रसेल (केकेआर), डेव्हीड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार (सनरायझर्स हैदराबाद), अक्षर पटेल (किंग्स-XI पंजाब), स्टीव्हन स्मिथ (राजस्थान रॉयल्स)

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणत्या संघात लागली कोणाची वर्णी.. कोणाला किती मिळाली किंमत..

बातम्या आणखी आहेत...