आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिका दौर्यातील भारतीय संघाच्या कामगिरीने सर्वांची निराशा झाली आहे. त्याचबरोबर या दौऱ्यास संघनिवडीवरूनही बरीच चर्चा आणि वादही झाले आहेत. भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गदांनी भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. या विषयांवर आपले मत मांडण्याऱ्यांपैकी एक म्हणजे सुनील गावसकर. गावसकर यांनी आता कसोटीत धोनीची कमतरता जाणवत असल्याचे वक्तव्य केले आहे. एका वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, धोनीने एवढ्यात निवृत्त व्हायला नको होते.
राहाणेच्या संघात स्थान न मिळण्याच्या मुद्द्यावरून चांगलेच वातावरण तापले. त्यानंतर दुसऱ्या कसोटीमध्ये भारताने पहिल्या कसोटीत सर्वाधिक यशस्वी ठरलेला गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाच विश्रांती दिली. या निर्णयांवर आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. त्यात दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी रोहित शर्माच्या रुपात तिसरी विकेट पडल्यानंतर पार्थिव टेलला फलंदाजीसाठी पाठवणेही अनेकांना रुचले नाही. सुनील गावसकर यांनीही या प्रकरणी स्पष्टपणे मत मांडले आहे. गावसकर यांनी यावेळी त्यांना धोनीची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले. धोनीने इतक्यात निवृत्ती घ्यायला नको होती, असेही गावसकर म्हणाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, काय म्हणाले गावसकर..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.