Home | Sports | From The Field | Ipl 2018 Chennai Superkings Vs Rajasthan Royals In Pune

IPL: शतकवीर शेन वाॅटसनचा झंझावात; चेन्नई सुपरकिंग्जचा पुण्यात राजस्थानवर विजय

वृत्तसंस्था | Update - Apr 21, 2018, 06:08 AM IST

शेन वाॅटसनच्या (१०६) झंझावाती शतकापाठाेपाठ चाहर (२/३०), शार्दूल ठाकूर (२/१८), ब्राव्हाे (२/१६) अाणि कर्ण शर्मा (२/१३) या

 • Ipl 2018 Chennai Superkings Vs Rajasthan Royals In Pune
  चेन्नईचा शतकवीर शेन वाॅटसन.

  पुणे - शेन वाॅटसनच्या (१०६) झंझावाती शतकापाठाेपाठ चाहर (२/३०), शार्दूल ठाकूर (२/१८), ब्राव्हाे (२/१६) अाणि कर्ण शर्मा (२/१३) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान चेन्नई सुपरकिंग्ज संघाने शुक्रवारी अायपीएलमध्ये अापल्या नव्या घरच्या मैदानावर विजयाचे खाते उघडले. चेन्नई टीमने पुण्यातील मैदानावर अजिंक्य रहाणेच्या राजस्थान राॅयल्सवर मात केली. चेन्नईने घरच्या मैदानावरील पहिला सामना ६४ धावांनी जिंकला. यासह चेन्नई टीमचा स्पर्धेतील हा तिसरा विजय ठरला.


  वाॅटसनच्या शतकाच्या बळावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमाेर विजयासाठी २०५ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरामध्ये राजस्थान राॅयल्स संघाला १८.३ षटकांत अवघ्या १४० धावांवर अापला गाशा गुंडाळावा लागला. राजस्थानकडून स्टाेक्सने ४५, बटलरने २२ अाणि कर्णधार रहाणेने १६ धावांची खेळी केली. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही.


  चेन्नईचे गाेलंदाज चमकले : घरच्या मैदानावर चेन्नईचे युवा गाेलंदाज चमकले. यात कर्ण शर्मासह चाहर, शार्दूल ठाकूर अाणि ब्राव्हाेचा समावेश अाहे. त्यांनी प्रत्येकी दाेन विकेट घेत राजस्थानचा अवघ्या १४० धावांत खुर्दा उडवला.

  सामनावीर शेन वाॅटसनचे शतक
  सामनावीर शेन वाॅटसनने शानदार शतक झळकावले. त्याने झंझावाती १०६ धावांची खेळी केली. त्याने ५७ चेंडूंचा सामना करताना ९ चाैकार अाणि ६ षटकारांसह १०६ धावा काढल्या. यासह त्याने पंजाबच्या क्रिस गेलपाठाेपाठ दुसऱ्या शतकाची नाेंद केली. यासह ताे यंदाच्या सत्रात दुसरा शतकवीर ठरला. अाता त्याच्या नावे सर्वाेत्तम १०६ धावांचीही नाेंद झाली.

  गंभीरसमाेर अाज ‘विराट’ अाव्हान

  अायपीएल सामन्यात क्रिस गेलच्या तुफानी फटकेबाजीच्या वादळाचा फटका काेलकात्यातील ईडन गार्डनवर शनिवारी यजमान काेलकाता नाइट रायडर्सला बसण्याची शक्यता अाहे. या ठिकाणी पंजाब अाणि काेलकाता यांच्यात सामना रंगणार अाहे. दुसरीकडे दिल्लीच्या टीमसमाेर काेहलीच्या यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचे अाव्हान असेल. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर शनिवारी रात्री खेळवला जाणार अाहे.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक व सामन्‍यांचे फोटोज...

 • Ipl 2018 Chennai Superkings Vs Rajasthan Royals In Pune
 • Ipl 2018 Chennai Superkings Vs Rajasthan Royals In Pune

  वॉटसनने 57 चेंडूंमध्‍ये 6 षटकार आणि 9 चौकार लगावले.

   

 • Ipl 2018 Chennai Superkings Vs Rajasthan Royals In Pune

  ड्वेन ब्राईटने जोस बटलर आणि राहुल त्रिपाठीला आऊट केले.

 • Ipl 2018 Chennai Superkings Vs Rajasthan Royals In Pune

  दिपक चाहनने हेनरिच क्‍लासेन आणि संजू सॅमसनला आऊट केले.

Trending