आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: दिल्ली डेअरडेव्हिल्सचा राजस्थान रॉयल्सवर 4 धावांंनी विजय, बटलरची तुफानी खेळी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोस बटलरने 18 चेंडूत अर्धशतक लगावले. - Divya Marathi
जोस बटलरने 18 चेंडूत अर्धशतक लगावले.

नवी दिल्ली - सामन्यादरम्यान पावसानंतर युवा फलंदाज ऋषभ पंत (६९)  आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या (५०) तुफानी फलंदाजीच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने राजस्थान रॉयल्सवर आयपीएलच्या ११ व्या रोमांचक सामन्यात ४ धावांनी विजय मिळवला.


बुधवारी फिरोजशाह कोटला मैदानावर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने पावसाच्या व्यत्ययानंतर १७.१ षटकांत ६ बाद १९६ धावांचा डोंगर उभारला. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार राजस्थानला १२ षटकांत १५१ धावांचे लक्ष्य दिले होते. राजस्थान रॉयल्स १२ षटकांत ५ बाद १४६ धावा करू शकला. दिल्लीच्या पंतने २९ चेंडूत ६९ धावांची खेळी केली.

 

कर्णधार श्रेयस अय्यरने ३५ चेंडूंत ५० धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४३ चेंडूंत ९२ धावांची भागीदारी रचली. पृथ्वी शॉने अवघ्या २५ चेंडूंत ४७ धावा केल्या. अय्यर व पृथ्वीने दुसऱ्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. ग्लेन मॅक्सवेल ५ धावांवर परतला. विजय शंकरने १७ धावा केल्या.

 

बटलरची तुफानी खेळी
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर ज्योस बटलरने तुफानी फलंदाजी करत संघाच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. बटलरने २६ चेंडूंत ४ चौकार आणि ७ षटकारांची बरसात करत ६७ धावांची खेळी केली. सलामीवीर शॉटने २५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४४ धावा काढल्या. बटलर व शाॅट या जोडीने ४० चेंडूंत ८२ धावांची सलामी दिली. त्यानंतर मधल्या फळीतील संजू सॅमसन, बेन स्टोक्स आणि राहुल त्रिपाठी मोठी खेळी करू शकले नाहीत. त्याचा फटका संघाला बसला. के. गौतमने ६ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचत नाबाद १८ धावांचे योगदान दिले. दिल्लीच्या ट्रेंट बोल्टने २६ धावांत २ गडी बाद केले. अमित मिश्रा व ग्लेन मॅक्सवेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...