आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2018 Kolkata Knight Riders Vs Rajasthan Royals 49th Match In Kolkata

IPL: कार्तिकचा विजयी षटकार; काेलकाता संघाने 6 गड्यांनी मिळवला सातवा विजय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुलदीप यादवने जोस बटलर, अजिंक्‍य रहाणे आणि बेन स्‍टोक्‍स या महत्‍त्‍वपूर्ण विकेट्स मिळवल्‍या. - Divya Marathi
कुलदीप यादवने जोस बटलर, अजिंक्‍य रहाणे आणि बेन स्‍टोक्‍स या महत्‍त्‍वपूर्ण विकेट्स मिळवल्‍या.

काेलकाता - कर्णधार दिनेश कार्तिकने घरच्या मैदानावर शानदार षटकार ठाेकून यजमान काेलकाता  नाइट रायडर्स संघाला मंगळवारी अायपीएलमध्ये  शानदार विजय मिळवून दिला. यजमान काेलकाता संघाने घरच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या राजस्थान राॅयल्स संघावर मात केली. काेलकाता संघाने ६ गड्यांनी सामना जिंकला.

 

या विजयाच्या बळावर काेलकाता टीमला प्ले अाॅफच्या प्रवेशाचा अापला दावा अधिक मजबूत करता अाला. या विजयाने अाता काेलकाता संघाचे १४ गुण झाले अाहेत. त्यामुळे काेलकाता तिसऱ्या स्थानावर कायम अाहे. राजस्थान संघाला सातव्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीमच्या अाशा धूसर झाल्या अाहेत. राजस्थान राॅयल्स संघ १२ गुणांसह गुणतालिकेत चाैथ्या स्थानावर अाहे.


सामनावीर कुलदीप यादवच्या (४/२०) धारदार गाेलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान राॅयल्सला १९ षटकांत १४२ धावांवर पॅव्हेलियन गाठावे लागले. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने १८ षटकांत ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाच्या विजयात सलामीवीर क्रिस लीनसह (४५) कर्णधार दिनेश कार्तिक (नाबाद ४१) अाणि अांद्रे रसेलने (नाबाद १०) माेलाचे याेगदान दिले. त्यामुळे काेलकाता संघाला घरच्या मैदानावर विजयश्री खेचून अाणता अाली. राजस्थानच्या बेन स्टाेक्सने धारदार गाेलंदाजी करताना ३ बळी घेतले. मात्र त्याला पराभव टाळता आला नाही.

 

सामनावीर कुलदीप यादवने घेतल्या चार विकेट
काेलकाता संघाच्या युवा गाेलंदाज कुलदीप यादवने अापल्या भेदक माऱ्याने राजस्थान राॅयल्सचे कंबरडे माेडले. त्याने ४ षटकांत अवघ्या २० धावा देत चार विकेट घेतल्या. त्यामुळे राजस्थानचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपुरा ठरला. त्याने बटलर, कर्णधार रहाणे, स्टाेक्स व बिन्नीला स्वस्तात बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...