आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IPL 11: क्रिस गेलचे नाबाद अर्धशतक; पंजाब किंग्जचा विजयी चाैकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेलकाता - स्फाेटक फलंदाज क्रिस गेलच्या (नाबाद ६२) झंझावाताच्या बळावर पुन्हा एकदा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ११ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (अायपीएल) शनिवारी धडाकेबाज विजयाची नाेंद केली. पंजाबच्या संघाने एेतिहासिक इडन गार्डन मैदानावर यजमान काेलकाता नाइट रायडर्सचा पराभव केला.

 

पंजाब संघाने डकवर्थ लुईसच्या अाधारे ९ गड्यांनी सामना जिंकला. अार. अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाचा लीगमधील हा चाैथा विजय ठरला. दुसरीकडे दिनेश कार्तिकच्या काेलकाता संघाला तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. पावसाच्या व्यत्ययामुळे काेलकात्याच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. त्यामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला.
क्रिस लीनच्या (७४) अर्धशतकाच्या अाधारे काेलकाता नाइट रायडर्सने  पंजाबसमाेर विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. पावसाच्या व्यत्ययामुळे पंजाब संघाला १३ षटकांत विजयासाठी १२५ धावांचे लक्ष्य मिळाले. प्रत्युत्तरात पंजाबने एका गड्याच्या माेबदल्यात ११.१ षटकांत सामना जिंकला. 


सामनावीर लाेकेशची शतकी भागीदारी :  गेलने  लाेकेेश राहुलसाेबत पहिल्या गड्यासाठी ११६ धावांची भागीदारी रचली. सामनावीर लाेकेशने २७ चेंडूंत ६० धावांची खेळी केली. 

 

क्रिस गेलचे शानदार अर्धशतक
शतकी खेळीने फाॅर्मात अालेल्या क्रिस गेलने शनिवारी इडन गार्डन मैदानावर तुफानी फटकेबाजी करताना अर्धशतक ठाेकले. त्याचे सत्रातील हे पहिले अर्धशतक ठरले. त्याने ३८ चेंडूंचा सामना करताना ५ चाैकार अाणि ६ षटकारांच्या अाधारे नाबाद ६२ धावा काढल्या. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, धावफलक...  

 

हेही वाचा,
बंगळुरू टीमचा राॅयल विजय, दिल्ली पराभूत; डिव्हिलियर्सने ठाेकले दुसरे अर्धशतक

बातम्या आणखी आहेत...