आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरू टीमचा राॅयल विजय, दिल्ली पराभूत; डिव्हिलियर्सने ठाेकले दुसरे अर्धशतक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमयध्‍ये 24वे अर्धशतक लगावले. - Divya Marathi
एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमयध्‍ये 24वे अर्धशतक लगावले.

बंगळुरू - डिव्हिलियर्सच्या (९०) नाबाद अर्धशतकाच्या बळावर यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शनिवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये शानदार विजय संपादन केला. बंगळुरू संघाने घरच्या मैदानावर ६ गड्यांनी सामना जिंकला. सलगच्या पराभवाची मालिका खंडित करत बंगळुरूच्या टीमने लीगमध्ये दुसऱ्या विजयाची नाेंद केली. दुसरीकडे गाैतम गंभीरचा अापल्या टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे दिल्लीच्या टीमला चाैथ्या पराभवाचा सामना करावा लागला. 


दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७४ धावा काढल्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाने अापल्या घरच्या मैदानावर ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य १८ षटकांत गाठले. यासह बंगळुरूच्या टीमला लीगमध्ये दुसऱ्या विजयाची नाेंद करता अाली. संघाच्या विजयामध्ये डिव्हिलियर्सचे माेलाचे याेगदान ठरले. याशिवाय कर्णधार विराट काेहली ३०, काेरी अँडरसन १५ अाणि मनदीप सिंगने नाबाद १७ धावांचे महत्त्वाचे याेगदान दिले. त्यामुळे बंगळुरूच्या टीमला विजयाची नाेंद करता अाली. 


श्रेयस, ऋषभची झुंज व्यर्थ : दिल्लीच्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी युवा फलंदाज श्रेयस अय्यर (५२) अाणि ऋषभ पंतने (८५) एकाकी झुंज दिली. मात्र, टीमच्या पराभवामुळे त्यांची ही खेळी व्यर्थ ठरली. अय्यरने ३१ चेंडूंचा सामना करताना ४ चाैकार अाणि ३ षटकारांच्या अाधारे ५२ धावांची खेळी केली. तसेच ऋषभने ४८ चेंडूंमध्ये ८५ धावा काढल्या. यामध्ये चाैकार अाणि ७ षटकारांचा समावेश अाहे. 

 

डिव्हिलियर्सने ठाेकले दुसरे अर्धशतक
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयी ट्रॅकवर अाणण्यासाठी डिव्हिलियर्सने तुफानी खेळी केली. यासह त्याने अापल्या झंझावाती खेळीच्या बळावर बंगळुरूला विजय मिळवून दिला. त्याने ३९ चेंडूंूचा सामना करताना १० चाैकार अाणि ५ षटकारांच्या अाधारे नाबाद ९० धावांची खेळी केली. त्याचे यंदाच्या लीगमधील हे दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने पंजाबविरुद्ध सामन्यामध्ये ५७ धावांची खेळी केली हाेती. 

बातम्या आणखी आहेत...