Home | Sports | From The Field | IPL 2018 Sunrisers Hyderabad Vs Delhi Daredevils In Delhi 42nd Match

विलियम्सन-धवनच्या भागीदारीने हैदराबादची दिल्‍लीवर 9 गड्यांनी मात; ऋषभचे शतक

वृत्तसंस्था | Update - May 11, 2018, 04:07 AM IST

कर्णधार विलियम्सन (८३) अाणि सामनावीर शिखर धवनच्या (९२) अभेद्य १७६ धावांच्या भागीदारीच्या बळावर हैदराबादने अायपीएलमध्ये म

 • IPL 2018 Sunrisers Hyderabad Vs Delhi Daredevils In Delhi 42nd Match

  नवी दिल्ली - कर्णधार विलियम्सन (८३) अाणि सामनावीर शिखर धवनच्या (९२) अभेद्य १७६ धावांच्या भागीदारीच्या बळावर हैदराबादने अायपीएलमध्ये माेठ्या विजयाची नाेंद केली. हैदराबादने गुरुवारी ९ गड्यांनी नववा विजय संपादन केला. हैदराबादने फिराेजशहा काेटला मैदानावर यजमान दिल्लीवर मात केली. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत १८ गुणांसह स्थान अधिक मजबूत केले.

  ऋषभच्या (१२८) नाबाद शतकानंतरही दिल्लीचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. या शतकाच्या बळावर दिल्लीने घरच्या मैदानावर हैदराबादसमाेर विजयासाठी १८८ धावांचे अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात हैदराबादने एका गड्याच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. विलियम्सन व धवनने तुफानी फटकेबाजी करताना विजयश्री खेचून अाणली.

  विलियम्सनचे सहावे अर्धशतक : हैदराबादच्या कर्णधार विलियम्सनने यंदाच्या सत्रातील सहाव्या अर्धशतकाची अापल्या नावे नाेंद केली. त्याने धावांची खेळी केली. यासह त्याने टीमच्या विजयात माेलाचे याेगदान दिले.

  ऋषभचे पहिले शतक
  दिल्लीच्या ऋषभ पंतने अायपीएल करिअरमध्ये पहिल्या शतकाची नाेंद केली. त्याने ६३ चेंडूंत १५ चाैकार व ७ षटकारांसह १२८ धावांची खेळी केली. ही त्याची अायपीएलमधील सर्वाेत्तम खेळी ठरली. याशिवाय यंदाच्या सत्रात ताे तिसरा शतकवीर ठरला. यापूर्वी, गेल अाणि वाॅटसनने शतके झळकावली. तसेच हे अायपीएलमधील ५० वे शतक ठरले.

  सामनावीर शिखर धवनच्या नाबाद ९२ धावा
  स्फाेटक फलंदाज शिखर धवनने दिल्लीविरुद्ध सामन्यात झंझावाती खेळी केली. त्याने ५० चेंडूंचा सामना करताना १० चाैकार अाणि ४ षटकाराच्या अाधारे नाबाद ९२ धावांची खेळी केली. त्याचे सत्रातील हे दुसरे अर्धशतक ठरले. यााशिवाय त्याने कर्णधार विलीयम्सनसाेबत अभेद्य १७६ धावांची माेठी भागीदारी रचली. यामुळे हैदराबादच्या संघाला विजय मिळवता अाला. दिल्लीचा हा अाठवा पराभव ठरला.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 • IPL 2018 Sunrisers Hyderabad Vs Delhi Daredevils In Delhi 42nd Match

  शिखर धवन आणि केन विलियमसनने दुस-या विकेटसाठी शतकी भागिदारी केली.

 • IPL 2018 Sunrisers Hyderabad Vs Delhi Daredevils In Delhi 42nd Match
  फाईल.

  दिल्‍लीच्‍या ऋषभ पंतने सर्वाधिक (521) धावा केल्‍या आहेत.

Trending