Home | Sports | From The Field | IPL 2018Kings XI Punjab Vs Royal Challengers Bangalore In Indore 48th Match

उमेशने उडवला पंजाबचा धुव्वा; बंगळुरू संघ 10 गड्यांनी विजयी

वृत्तसंस्था | Update - May 15, 2018, 01:03 AM IST

काेहलीच्या नेतृत्वाखाली राॅयल चॅलेजर्स बंगळुरू संघाने ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये साेमवारी धडाकेबाज विजयाची नाेंद केल

 • IPL 2018Kings XI Punjab Vs Royal Challengers Bangalore In Indore 48th Match
  सामनावीर उमेशने तीन बळी घेतले.

  इंदूर - काेहलीच्या नेतृत्वाखाली राॅयल चॅलेजर्स बंगळुरू संघाने ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये साेमवारी धडाकेबाज विजयाची नाेंद केली. बंगळुरू संघाने लीगमधील अापल्या १२ व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर १० गड्यांनी मात केली. यामुळे पंजाबची पाचव्या स्थानावर घसरण झाली.


  उमेश यादवच्या (३/२३) धारदार गाेलंदाजीनंतर कर्णधार विराट काेहली (४८) अाणि पार्थिव पटेल (४०) यांच्या अभेद्य अर्धशतकी भागीदारीच्या बळावर बंगळुरूने ८.१ षटकांत सामना जिंकला. यासह बंगळुरूने लीगमध्ये पाचव्या विजयाची नाेंद केली. दुसरीकडे सुमार कामगिरीमुळे पंजाबला सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंजाबच्या प्ले अाॅफ प्रवेशाच्या अडचणीत अाता वाढ झाली अाहे.


  बंगळुरूच्या धारदार गाेलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने अवघ्या १५.१ षटकांत ८८ धावा काढून पॅव्हेलियन गाठले. प्रत्युत्तरात बंगळुरूने बिनबाद विजयाचे लक्ष्य सहज गाठले.


  विराट काेहलीच्या पाचव्यांदा सत्रामध्ये ५०० पेक्षा धावा
  बंगळुरूचा कर्णधार विराट काेहलीने साेमवारी पंजाबविरुद्ध सामन्यात नाबाद ४८ धावा काढल्या. यासह त्याने यंदाच्या सत्रात ५०० धावांचा पल्ला गाठला. त्याने अायपीएलच्या करिअरमध्ये पाचव्यांदा अशी कामगिरी केली अाहे. यामध्ये २०१६ (९७३ धावा), २०१५ (५०५), २०१३ (६३४) अाणि २०११ (५५७) समावेश अाहे. अाता त्याच्या ५१४ धावा झाल्या.

  सामनावीर उमेशचे तीन बळी
  बंगळुरूचा गाेलंदाज उमेश यादवने पंजाब संघाचे कंबरडे माेडले. त्याने धारदार गाेलंदाजी करताना ४ षटकांत २३ धावा देताना ३ विकेट घेतल्या. त्यापाठाेपाठ सिराज, यजुवेंद्र चहल, माेईन अली अाणि ग्रँडहाेमेने प्रत्येकी एक गडी बाद केला.

  पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

 • IPL 2018Kings XI Punjab Vs Royal Challengers Bangalore In Indore 48th Match
  विराट कोहलीने पार्थिव पटेलसोबत पहिल्‍या विकेटसाठी 92 धावांची भागिदारी केली.
 • IPL 2018Kings XI Punjab Vs Royal Challengers Bangalore In Indore 48th Match

  उमेश यादवने पंजाबचा ओपनर क्रिस गेल आणि केएल राहुलला आऊट केले.

Trending