आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: धाेनीच्या नेतृत्वात चेन्नईला अाठव्यांदा फायनलची संधी; हैदराबादविरुद्ध अाज सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तीन वेळचा किताब विजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ अाता कर्णधार महेेंद्र सिंग धाेनीच्या नेतृत्वात अाठव्यांदा इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी सज्ज झाला.  चेन्नईला    हा पल्ला यशस्वीपणे गाठण्याची माेठी संधी अाहे. मंगळवारी अंतिम फेरीतील प्रवेशासाठी धाेनीचा चेन्नई सुपरकिंग्ज व सनरायझर्स हैदराबाद संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर समाेरासमाेर असतील. चेन्नईने  सात वेळा अंतिम फेरी गाठली अाहे. त्यामुळे अाठव्यांदा फायनल गाठण्याचा धाेनीचा प्रयत्न असेल.  २०१६ च्या विजेत्या हैदराबादने  दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी कंबर कसली. 

 

धाेनीला संधी 
कर्णधार महेंद्रसिंग धाेनीला अाता विजयाची माेठी संधी अाहे. गत सामना जिंकून चेन्नई संघाने किताबाचा अापला दावा मजबूत केला. त्यामुळे अाता पुन्हा विजयाचा हाच कित्ता गिरवण्याचा चेन्नई संघाचा प्रयत्न असेल. यासाठी सुरेश रैनाही सज्ज झाला अाहे. 

 

हैदराबादवर पराभवाचे सावट 
कर्णधार विलियम्सन फाॅर्मात असला तरीही सनरायझर्स हैदराबाद संघाला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे अाता सुमार खेळीमुळे टीमवर चाैथ्या पराभवाचेही सावट निर्माण झालेले अाहे.

बातम्या आणखी आहेत...