Home | Sports | From The Field | IPL: Chennai ready for third champions; Hyderabad look second in the tournament

IPL : तिसऱ्यांदा चॅम्पियनसाठी चेन्नई सज्ज; हैदराबादची नजर दुसऱ्या जेतेपदावर

वृत्तसंस्था | Update - May 27, 2018, 10:34 AM IST

दाेन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघ अाता तिसऱ्यांदा अायपीएलचा किताब जिंकण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी कर्णधार महेंद

 • IPL: Chennai ready for third champions; Hyderabad look second in the tournament

  मुंबई - दाेन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघ अाता तिसऱ्यांदा अायपीएलचा किताब जिंकण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धाेनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने कंबर कसली. रविवारी वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्ज अाणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात फायनल मुकाबला हाेणार अाहे. विलियम्सनच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ किताब जिंकण्यासाठी सज्ज झाला अाहे.

  अाता दुसऱ्यांदा चॅम्पियन हाेण्याचा हैदराबाद संघाचा प्रयत्न असेल. हैदराबादला नमवूनच चेन्नईने यंदाच्या अायपीएलची फायनल गाठली. त्यामुळे अाता पुन्हा हैदराबादला धूळ चारून किताबावर नाव काेरण्यासाठी चेन्नई संघ प्रयत्नशील राहणार अाहे. त्यामुळे हा सामना रंगतदार हाेण्याचे चित्र अाहे.


  फाफ डुप्लेसिससह सुरेश रैनाच्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर चेन्नई संघाला अंतिम फेरीचा पल्ला गाठता अाला. त्यामुळे अाता ट्राॅफी जिंकण्यासाठी चेन्नईचे युवा उत्सुक अाहेत. यापूर्वी २०१० अाणि २०११ मध्ये चेन्नईचा संघ चॅम्पियन ठरला हाेता. त्यानंतर टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

  > हैदराबादची मदार
  - कर्णधार विलियम्सन : हैदराबादच्या विजयासाठी विलियम्सनने सातत्याने महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने सत्रात ८ अर्धशतकांसह सर्वाधिक ६८५ धावा काढल्या अाहेत.
  - रशीद खान : अष्टपैलू कामगिरीने रशीद खानकडून अाता चाहत्यांचा अपेक्षा वाढल्या. त्याने २०.६६ च्या सरासरीने २१ विकेट घेतल्या अाहेत.
  - शाकिब : अाॅलराउंडर शाकिबही सरस कामगिरी करत अाहे. त्याने अातापर्यंत १४ विकेट घेतल्या अाहेत.
  - संदीप शर्मा : चांगली कामगिरी करत ११ बळी घेतले अाहेत.
  - भुवनेश्वर : सत्रात ९ विकेट घेणारा भुवनेश्वर उल्लेखनीय कामगिरीचा दावेदार.

  हैदराबाद वानखेेडेवर करणार पराभवाची परतफेड

  पहिल्या क्वालिफायरमधील पराभवामुळे हैदराबाद संघाला दुसऱ्या सामन्यात अापला कस लावावा लागला. त्यामुळे अाता याच पराभवाची परतफेड चेन्नई संघाला करण्याची संधी हैदराबादच्या संघाला अाहे. चेन्नईने मुंबईच्या वानखेडेवर हैदराबादचा पराभव केला अाणि अायपीएलच्या अंतिम फेरी गाठली हाेती. त्यामुळे अाता वानखेडेवर हाेणार हा सामना अधिकच अटीतटीच हाेईल. यात हैदराबादवर सर्वांची नजर असेल.

  > चेन्नईची मदार
  - कर्णधार धाेनी : फिनिशर धाेनीने अंतिम फेरीचा पल्ला गाठण्यासाठी अव्वल कामगिरी केली. त्याच्या नावे एकूण ४५५ धावा अाहेत.
  - अंबाती रायडू : अंबाती रायडूचेही माेलाचे याेगदान ठरले. त्याने दाेन अर्धशतकांसह शतकाची खेळी केली. त्याच्या नावे संघाकडून सर्वाधिक ५८६ धावा अाहे.
  - शेन वाॅटसन : झंझावाती खेळीतून शेन वाॅटसनने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने एकूण ४३८ धावा काढल्या अाहेत.
  - शार्दूल ठाकूर : एकूण १५ विकेट घेतल्या अाहेत. त्यामुळे टीमला त्याच्याकडून धारदार गाेलंदाजीची अाशा.
  - ब्राव्हाे : चेन्नईचा डॅवेन ब्राव्हाे अष्टपैलू कामगिरीतून सर्वांचे लक्ष वेधत अाहे.

Trending