Home | Sports | From The Field | IPL DD vs MI: Shreyas Iyer took the wicket; Delhi wins

IPL DD vs MI : श्रेयस अय्यरने घेतली राेहितची विकेट; दिल्ली विजयी,मुंबईचे अाव्हान संपुष्टात

वृत्तसंस्था | Update - May 21, 2018, 01:10 AM IST

युवा कर्णधार श्रेयस अय्यरने अापल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर अायपीएलमध्ये राेहित शर्माची विकेट घेतली. यजमान दिल्ली संघाने

 • IPL DD vs MI: Shreyas Iyer took the wicket; Delhi wins

  नवी दिल्ली - युवा कर्णधार श्रेयस अय्यरने अापल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर अायपीएलमध्ये राेहित शर्माची विकेट घेतली. यजमान दिल्ली संघाने रविवारी अापल्या घरच्या मैदानावरील शेवटच्या सामन्यात मुंबईवर ११ धावांनी मात केली. यासह दिल्लीने घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या विजयाची नाेंद केली. या ‘करा वा मरा’ सामन्यातील पराभवाने मुंबई संघाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. या लाजिरवाण्या पराभवाने तीन वेळच्या चॅम्पियन मुंबई संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की अाेढवली.


  सामनावीर अमित मिश्रा (३/१९), संदीप लामिच्छाने (३/३६) अाणि हर्षल पटेल (३/२८) या युवा गाेलंदाजांनी प्ले अाॅफ प्रवेशसाठी धडपडणाऱ्या मुंबई इंडियन्सचे कंबरडे माेडले. त्यामुळे मुंबईला १९.३ षटकांत अापला गाशा गुंडाळावा लागला.
  फाॅर्मात असलेला युवा फलंदाज ऋषभ पंतच्या (६४) झंझावाती फलंदाजीच्या बळावर यजमान दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमाेर विजयासाठी १७५ धावांचे खडतर लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात मुंबई संघाचा अवघ्या १६३ धावांवर खुर्दा उडाला. याच सुमार खेळीमुळे झालेल्या पराभवाने मुंबईचे स्वप्न भंगले.


  मुंबईच्या विजयासाठी लेव्हिस (४८) अाणि बेन कटिंगने (३७) एकाकी झंुज दिली. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. इतर फलंदाजांना फार काळ अाव्हान कायम ठेवता अाले नाही. त्यामुळे राेहित शर्मा (१३), हार्दिक (४), ईशान किशन (५), पाेलार्ड (७) हे झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले.


  सामनावीर अमितची धारदार गाेलंदाजी : दिल्लीचा युवा गाेलंदाज अमित मिश्रा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने सामन्यात धारदार गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. त्याने चार षटकांत १९ धावा देताना हे यश संपादन केले. तसेच हर्षल पटेल अाणि संदीपनेही प्रत्येकी ३ गडी बाद केले. त्यामुळे मुंबईचा धुव्वा उडाला.

  ऋषभचा झंझावात; सत्रामध्ये बाउंड्रीचे शतक

  ऋषभ पंतने मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात ऋषभने विक्रम केला आहे. त्याने सत्रात बाउंड्रीचे (चौकार आणि षटकार) शतक ठाेकले. असे करणारा ताे चौथा खेळाडू ठरला. सत्रातील १४ सामन्यांत त्याने ६८ चौकार आणि ३७ षटकार मारले आहेत. यापूर्वी गेलने २०११ (५७ चौकार आणि ४४ षटकार), २०१२ (४६ चौकार आणि ५९ षटकार), २०१३ (५७ चौकार आणि ५१ षटकार), विराट कोहलीने २०१६ ला (८३ चौकार आणि ३८ षटकार) ठाेकले.

  पुढील स्लाईडवर पहा... सामन्याचे धावफलक...

 • IPL DD vs MI: Shreyas Iyer took the wicket; Delhi wins
 • IPL DD vs MI: Shreyas Iyer took the wicket; Delhi wins

Trending