आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: घरच्या मैदानावर दिल्लीचा शेवट गाेड; चेन्नईवर विजय; ऋषभच्या 600 धावा पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - युवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या कुशल नेतृत्वात यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सने अापल्या घरच्या मैदानावरील अायपीएलचा  सामना जिंकला. यासह दिल्लीने हाेमग्राउंडवरील शेवट गाेड केला. यजमान दिल्लीने फिराेजशहा काेटला मैदानावर शुक्रवारी महेंद्रसिंग धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जवर ३४ धावांनी मात केली. स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अालेल्या दिल्लीचा हा लीगमधील चाैथा विजय ठरला. दुसरीकडे प्ले अाॅफमधील प्रवेश निश्चित केलेल्या चेन्नईच्या टीमला लीगमध्ये पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. 


युवा फलंदाज ऋषभ पंतच्या (३८) शानदार फलंदाजीच्या बळावर यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सने प्रथम फलंदाजी करताना चेन्नईसमाेर विजयासाठी खडतर १६३ धावांचे अाव्हान ठेवले हाेते. प्रत्युत्तरात चेन्नई सुपरकिंग्जला ६ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १२८ धावांपर्यंत मजल मारता अाली. संघाच्या विजयासाठी अंबाती रायडू (५०), धाेनी (१७) अाणि रवींद्र जडेजाने (नाबाद २७) दिलेली एकाकी झंुज व्यर्थ ठरली. त्यामुळे चेन्नईच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीकडून बाेल्ट (२/२०) अाणि अमित मिश्राने (२/१४) घरच्या मैदानावर धारदार गाेलंदाजी केली. दिल्लीकडून संदीप लामिच्छाने व हर्षल पटेलने प्रत्येक विकेट घेतली. 

 

ऋषभच्या ६०० धावा पूर्ण; ठरला तिसरा फलंदाज 
दिल्लीच्या फाॅर्मात असलेल्या युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने अापला झंझावात कायम ठेवला. त्याने ३८ धावांची खेळी केली. यासह त्याने यंदाच्या सत्रात ६०० धावांचा पल्ला यशस्वीपणे गाठला. अशा प्रकारे सत्रात  ६०० धावा पूर्ण करणारा ताे तिसरा फलंदाज ठरला.

 

हर्षल सामनावीर : दिल्लीच्या युवा गाेलंदाज हर्षल पटेलने सामनावीरचा पुरस्कार पटकावला. त्याने अष्टपैलू कामगिरी करताना नाबाद ३६ धावांची खेळी केली. तसेच गाेलंदाजी करताना एक विकेट घेतली. त्याने रायडूला बाद केले. 

 

पुढील स्लाईड वर पहा सामन्याचे धावफलक.... 

 

बातम्या आणखी आहेत...