Home | Sports | From The Field | IPL: kohli holds Hyderabad; Bangalore won by 14 runs

IPL: काेहलीने हैदराबादला राेखले; 14 धावांनी बंगळुरू विजयी; विजयासह पाचव्या स्थानावर धडक

वृत्तसंस्था | Update - May 18, 2018, 02:21 AM IST

विराट काेहलीच्या कुशल नेतृत्वाखाली यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये अापल्या घरच्या मै

 • IPL: kohli holds Hyderabad; Bangalore won by 14 runs

  बंगळुरू - विराट काेहलीच्या कुशल नेतृत्वाखाली यजमान राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये अापल्या घरच्या मैदानावर राेमहर्षक विजयाची नाेंद केली. बंगळुरू संघाने लीगमधील अापल्या १३ व्या सामन्यात अव्वल स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव केला. यजमान बंगळुरू संघाने १४ धावांनी सामना जिंकला. या शानदार सहाव्या विजयाच्या बळावर बंगळुरू संघाने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर धडक मारली.


  डिव्हिलियर्स (६९) अाणि माेईन अली (६५) यांच्या अर्धशतकांच्या बळावर बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसमाेर विजयासाठी २१९ धावांचे खडतर अाव्हान ठेवले हाेेते. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघाला ३ गड्यांच्या माेबदल्यात २०४ धावांपर्यंत मजल मारता अाली. हैदराबादच्या विजयासाठी कर्णधार विलियम्सन अाणि मनीष पांडेने एकाकी झुंज दिली. मात्र, त्यांना अापल्या टीमचा पराभव टाळता अाला नाही. त्यामुळे टीमला पराभवचा सामना करावा लागला.


  विलियम्सनचे अाठवे अर्धशतक

  फाॅर्मात असलेल्या कर्णधार विलियम्सनने अापली लय कायम ठेवताना गुरुवारी यंदाच्या सत्रात अाठवे अर्धशतक साजरे केले. त्याने तुफानी खेळी करताना ४२ चेंडंूचा सामना करताना ७ चाैकार अाणि ३ षटकारांसह ८१ धावा काढल्या.


  मनीषची झुंज व्यर्थ

  मनीष पांडेने विजयासाठीची एकाकी झुंज व्यर्थ ठरली. त्याने ३८ चेंंडूंचा सामना करताना सात चाैकार अाणि दाेन षटकरांसह नाबाद ६२ धावांची खेळी केली.

  सामनावीर डिव्हिलियर्सने घेतला थरारक झेल
  सामनावीर डिव्हिलियर्सने सामन्यात लक्षवेधी कामगिरी केली. त्याने फलंदाजी करताना शानदार अर्धशतक साजरे केले. त्याने ३९ चेंडूंचा सामना करताना १२ चाैकार अाणि एका षटकारासह ६९ धावा काढल्या. तसेच क्षेत्ररक्षणादरम्यान त्याने सीमारेषेवर हेल्सचा थरारक झेल घेतला.

  पुढील स्लाईडवर पहा, सामन्याचे धावफलक...

 • IPL: kohli holds Hyderabad; Bangalore won by 14 runs
 • IPL: kohli holds Hyderabad; Bangalore won by 14 runs

Trending