IPL: राजस्थानने चेन्नईवर / IPL: राजस्थानने चेन्नईवर चार गड्यांनी विजय मिळवला, जोस बटलरचे सलग चौथे अर्धशतक

IPL: राजस्थानने चेन्नईवर चार गड्यांनी विजय मिळवला, जोस बटलरचे लागातार चौथे अर्धशतक .बटलरचा झंझावात, राजस्थानच्या अाशा कायम; चेन्नईवर केली चार गड्यांनी मात.जाेस बटलरच्या (९५) नाबाद झंझावाती खेळीच्या बळावर राजस्थान संघाने शुक्रवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये राॅयल विजयाची नाेंद केली. राजस्थानने अापल्या घरच्या मैदानावर महेंद्र सिंग धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. राजस्थानने ४ गड्यांनी सामना जिंकला. यासह राजस्थानने लीगमध्ये पाचवा सामना जिंकला. दुसरीकडे चेन्नईचा अाठव्या विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. या विजयाने राजस्थानच्या प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा कायम राहिल्या.

वृत्तसंस्था

May 12,2018 07:28:00 AM IST

जयपूर - जाेस बटलरच्या (९५) नाबाद झंझावाती खेळीच्या बळावर राजस्थान संघाने शुक्रवारी ११ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये राॅयल विजयाची नाेंद केली. राजस्थानने अापल्या घरच्या मैदानावर महेंद्र सिंग धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव केला. राजस्थानने ४ गड्यांनी सामना जिंकला. यासह राजस्थानने लीगमध्ये पाचवा सामना जिंकला. दुसरीकडे चेन्नईचा अाठव्या विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. या विजयाने राजस्थानच्या प्ले अाॅफ प्रवेशाच्या अाशा कायम राहिल्या.


सुरेश रैनाच्या (५२) अर्धशतकाच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७६ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात राजस्थान राॅयल्स संघाने १९.५ षटकांत ६ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. बटलरच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर राजस्थान संघाने अटीतटीच्या या लढतीत चुरशीने विजयश्री खेचून अाणली. दरम्यान राजस्थानला राेखण्याचा धाेनीच्या चेन्नई संघाचा प्रयत्न अपुरा ठरला. त्यामुळे चेन्नईचा पराभव झाला.

सामनावीर बटलर
राजस्थानच्या सामनावीर जाेस बटलरने सामन्यात चेन्नईच्या सुमार गाेलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. त्याने ६० चेंडूंचा सामना करताना ११ चाैकारांसह २ उत्तंुग षटकार ठाेकून नाबाद ९५ धावांची खेळी केली. यासह त्याने राजस्थान संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले.

पुढील स्लाईडवर पहा, सामन्याचे धावफलक.....

X
COMMENT